माहिती आणि प्रसारण मंत्रालय
'टॉक्सिक' या लिथुआनियन चित्रपटाला इफ्फ्फी (IFFI) 2024 मध्ये प्रतिष्ठेचा गोल्डन पीकॉक पुरस्कार घोषित
वेस्टा मातुलिते आणि इवा रुपेकाईटे यांना 'टॉक्सिक' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार
#IFFIWood, 28 November 2024
गोव्यामधील 55 व्या इफ्फी (IFFI), अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज 'टॉक्सिक' या लिथुआनियन चित्रपटाला इफ्फी (IFFI) 2024 चा सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठीचा प्रतिष्ठेचा गोल्डन पीकॉक ( सुवर्ण मयूर) पुरस्कार घोषित झाला.
चित्रपटाचे दिग्दर्शक शौले ब्लियुवेट आणि निर्माता गीएदर बुरोकेत यांना एकत्रितपणे हा पुरस्कार घोषित झाला असून, गोल्डन पीकॉक मानचिन्ह, प्रमाणपत्र, आणि रोख रु. 40,00,000, असे त्याचे स्वरूप आहे.
ज्युरींनी (निवड समिती) खोल संवेदनशीलता आणि सहवेदना यासाठी या चित्रपटाची प्रशंसा केली असून, त्याचे कथानक तीव्र भौतिक आणि सामाजिक पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या नायकाचा जीवनपट उलगडते.
टॉक्सिक हा चित्रपट “आर्थिक दृष्ट्या दुर्बल समाजात पौगंडावस्था आणि वयात येताना समोर येणारे कटू वास्तव, अत्यंत संवेदनशीलता आणि सहानुभूतीने सादर करतो, आणि त्याच वेळी, भौतिक आणि सामाजिक परिप्रेक्षात नायकाचा जीवनपट उलगडतो, तो सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.” असे ज्युरीने स्पष्ट केले.
दूषित भौतिक आणि सामाजिक परिप्रेक्षात एक योग्य शीर्षक असलेली ही कथा आहे. मानवी शरीराच्या सर्व मर्यादा आणि दिमाख याचा शोध टॉक्सिकच्या केंद्रस्थानी आहे.
या चित्रपटात तेरा वर्षांच्या मारिजाची कहाणी आहे. आपल्या आजीबरोबर ती राहते, आणि औद्योगिक शहरात जीवनाची घडी बसवताना तिच्यापुढे अनेक अडचणी येतात. ती आपल्याच वयाच्या बंडखोर क्रिस्टीनाबरोबर तात्पुरते आणि अस्थिर नाते जोडायचा प्रयत्न करते, आणि दोघी स्थानिक मॉडेलिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतात, जे आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निराशामय आणि अस्तित्वहीन जीवनापेक्षा वेगळे, आकर्षक जीवन मिळवण्याची संधी देण्याचे वचन देते.
मात्र शाळेचे निकष पूर्ण करताना, आपल्या तरुण शरीराला सौंदर्याच्या मानकांमध्ये बसवताना त्यांना अत्यंत धोकादायक मार्ग शोधणे भाग पडते.
चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी, वेस्टा मातुलिते आणि इवा रुपेकाइते यांना सर्वोत्कृष्ट अभिनय (महिला) पुरस्कार संयुक्तपणे देण्यात आला. “वेस्टा मॅटुलिते आणि इवा रुपेकाईते या दोन अभिनेत्रींच्या पदार्पणातील असामान्य कामगिरीसाठी, ज्यांनी मारिजा आणि क्रिस्टीनाची अविस्मरणीय पात्रे जिवंत करताना स्वतःची शारीरिक आणि भावनिक परिसीमा ओलांडली,हा पुरस्कार देण्यात आला आहे" असै ज्युरींनी सांगितले.
***
PIB IFFI CAST AND CREW |Gopal/Rajashri/Parshuram
(Release ID: 2078806)
Visitor Counter : 10