माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इतरांच्या आयुष्यात डोकावून पाहणाऱ्या लोकांच्या आयुष्यात डोकावून पाहण्यात मला रस होता: "दिव्या हेमंत खरनारे, 'पी फॉर पापाराझी'चे दिग्दर्शक
'बही - ट्रेसिंग माय ॲन्सेस्टर्स' जीवनाचे अनंतकाळ आणि कालातीत सातत्य निर्माण करते: दिग्दर्शिका रचिता गोरोवाला
#IFFIWood, 27 नोव्हेंबर 2024
आजही तो नेहमीप्रमाणे त्याच्या कामात व्यग्र होता. मनोजला कधीच स्वतःवर कॅमेरा रोखलेला आवडत नव्हता!
'पी फॉर पापाराझी' च्या पाठीमागील चमू प्रसारमाध्यमांना संबोधित करत असताना, अनुभवी पापाराझीची मध्यवर्ती भूमिका साकारणारा मनोज घटनांच्या वावटळीत सापडला. त्याक्षणी तो 55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) मास्टरक्लाससाठी पोहोचलेल्या दिग्गज संगीत दिग्दर्शक ए.आर. रहमानचा पाठलाग करत होता. या दृश्याने चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना विशद केली: प्रसिद्धीचा पाठलाग करतानाच तिचा वापर करण्याचा विरोधाभास.
‘पी फॉर पापाराझी’ आणि ‘बही – ट्रेसिंग माय ॲन्सेस्टर्स’ या चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी आज गोव्यात ५५व्या इफ्फीमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित केले.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना ‘पी फॉर पापाराझी’ चित्रपटाचे दिग्दर्शिक दिव्या हेमंत खरनारे म्हणाले की, त्यांना पापाराझींच्या जीवनात आणि त्यांच्या जीवनाभोवती फिरणाऱ्या गोंधळ आणि उन्मादात रस होता. “मला अशा लोकांच्या जीवनात डोकावून पाहण्यात रस होता, जे इतरांच्या आयुष्यात डोकावतात आणि कॅमेरा त्यांच्याकडे वळल्यावर त्यांचे काय होते”, दिग्दर्शक म्हणाले. लहानपणीच ते वर्तमानपत्रांच्या चमकत्या विभागाकडे ओढले गेले, आणि जसजसे ते मोठे होत गेले तसतसे त्यांना हे क्षण टिपण्यासाठी पापाराझींनी वापरलेल्या पद्धतींमध्ये अधिकाधिक रस वाटू लागला. त्यांनी त्यांच्या जीवनाचा अधिक संतुलित दृष्टिकोन मांडण्याची इच्छा देखील व्यक्त केली, कारण प्रसारमाध्यमे अनेकदा त्यांना एक-आयामी पद्धतीने चित्रित करतात.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ‘बही – ट्रेसिंग माय ॲन्सेस्टर्स’ च्या दिग्दर्शिका रचिता गोरोवाला यांनी सामायिक केले की हा चित्रपट हरिद्वारमधील तीर्थ पुरोहित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरोहितांच्या अद्वितीय गटाद्वारे रेकॉर्ड ठेवण्याच्या परंपरेचा वेध घेतो. या पवित्र नोंदी, ज्यांना बही म्हणून संबोधले जाते, त्यांनी शतकानुशतके कुटुंबांच्या पूर्वजांच्या इतिहासाचे रक्षण केले आहे. रचिताने स्पष्ट केले की हा चित्रपट या परंपरेतील विधी आणि पद्धतींचा खोलवर विचार करत असताना, त्याचा केंद्रबिंदू शाश्वततेच्या गहन तत्त्वज्ञानावर आधारित आहे. बही वाहत्या गंगेत गुंफलेली आहे, जी जीवनाच्या कालातीत निरंतरतेचे प्रतीक आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात दिग्दर्शिकेने खुलासा केला की या कथेचा जन्म व्यापक संशोधनातून आणि हरिद्वारच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या सखोल शोधातून झाला आहे.
चित्रपटांबद्दल
'बही - ट्रेसिंग माय ॲन्सेस्टर्स’
सारांश
शतकानुशतके हरिद्वारच्या अंतर्गत जगामध्ये, अंगठ्याचे ठसे, स्वाक्षरी आणि हस्तलिखित नोंदींनी कुटुंबांना त्यांच्या पूर्वजांच्या उत्पत्तीचा नकाशा तयार करण्याची परवानगी दिली आहे. बही म्हणून ओळखले जाणारे, हे रेकॉर्ड केवळ तीर्थ पुरोहित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंडितांच्या पिढीद्वारे राखले जातात. गंगेच्या काठावरच्या एका छोट्याशा खोलीत माणुसकीच्या लाटांवर लाटा गुंडाळ्यांमध्ये घट्टपणे कैद केल्या जातात.
कलाकार आणि चमू
दिग्दर्शिका: रचिता गोरोवाला
निर्माता: बीबीपी स्टुडिओ आभासी भारत
पटकथा लेखक: रचिता गोरोवाला
सिनेमॅटोग्राफर : सुदीप इलामन
संपादक: सायन देबनाथ, क्रिस्टी सेबॅस्टियन
पी फॉर पापाराझी
सारांश
"चमकणारे दिवे आणि वेड्यांच्या गर्दीच्या गोंधळात मनोज, नेपाळमधील एक प्रस्थापित पापाराझी, सर्वात सनसनाटी फोटो काढण्याच्या शर्यतीत सहकारी छायाचित्रकारांशी सामना करतो. त्याचा वर्षानुवर्षांचा अनुभव आणि बोनी कपूरपासून आलिया भट्टपर्यंत अनेक सेलिब्रिटींशी संबंध असूनही , मनोजला स्वतःला त्याच्या भावाच्या बिघडत चाललेल्या प्रकृतीचा सामना करावा लागतो . मनोज मुंबईच्या घामट रात्री धावपळ करत असतो, ख्यातनाम व्यक्तींसोबतच्या त्याच्या भेटीतून मनोरंजन उद्योगातील ग्लिट्ज आणि ग्लॅमरची झलक दिसून येते परंतु प्रसिद्धीमागची मानवी बाजू देखील अधोरेखित होते.
कॅमेऱ्याच्या प्रत्येक क्लिकवर, मनोज त्याच्या व्यवसायातील नैतिक कोंडी आणि त्याच्या भावाच्या नशिबाचा तोल सांभाळत आहे. मनोजचे संबंध आणि चिकाटी त्याच्या भावाच्या उपचारासाठी लागणारा निधी सुरक्षित करण्यासाठी पुरेशी असेल का त्याला जगण्यासाठी एकाकी लढाईला सामोरे जावे लागेल?”
कलाकार आणि चमू
दिग्दर्शक : दिव्या खरनारे
निर्माता : राजीव मेहरोत्रा
पटकथा लेखक : दिग्दर्शन : दिव्या खरनारे
सिनेमॅटोग्राफर : दिव्या खरनारे, पुष्कर सरनाईक
संपादक: प्रणव पाटील
पत्रकार परिषद येथे पहा:
* * *
PIB IFFI CAST AND CREW | S.Patil/Nandini/Darshana | IFFI 55
(Release ID: 2078231)
Visitor Counter : 8