पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी शशिकांत रुईया यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला
प्रविष्टि तिथि:
26 NOV 2024 12:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या उद्योग विश्वातील मान्यवर शशिकांत रुईयाजी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. नवोन्मेष आणि विकासाच्या बाबतीत उच्च मापदंड स्थापित केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी रुईया यांची प्रशंसा केली.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात:
“शशिकांत रुईयाजी उद्योग जगतातील महान व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि उत्कृष्टतेप्रती अविचल कटिबद्धता यामुळे भारताच्या व्यापारविषयक परिदृष्याचा कायापालट झाला. त्यांनी नवोन्मेष आणि विकासाच्या बाबतीत देखील उच्च मापदंड स्थापित केले. त्यांच्याजवळ नेहमीच नवनवीन कल्पनांचा साठा असायचा आणि आपण आपल्या देशाला अधिक चांगले कसे बनवू शकतो यावर ते नेहमीच चर्चा करत असायचे.
शशिजी यांचे आपल्यातून निघून जाणे अत्यंत दुःखदायक आहे. या दुःखद काळात त्यांचे कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्ती यांच्याप्रती मी तीव्र संवेदना व्यक्त करतो.”
* * *
H.Akude/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2077328)
आगंतुक पटल : 84
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam