संरक्षण मंत्रालय
संरक्षण सचिवांनी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन शहीद वीरांना वाहिली आदरांजली
Posted On:
23 NOV 2024 1:29PM by PIB Mumbai
एनसीसी (NCC), अर्थात राष्ट्रीय छात्र सेना, ही 1948 साली स्थापन झालेली जगातील सर्वात मोठी गणवेशधारी युवा संघटना, 24 नोव्हेंबर 2024 रोजी आपला 76 वा स्थापना दिवस पारंपरिक उत्साहात साजरा करत आहे. या दिना निमित्त, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक, इंडिया गेट, नवी दिल्ली येथे एनसीसी संघटनेच्या वतीने शहीद वीरांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी बोलताना संरक्षण सचिव म्हणाले की, एनसीसी ने कॅडेट्सची संख्या 3 लाखांनी वाढवण्याचा प्रशंसनीय प्रयत्न केला असून, येत्या काही वर्षांत ही संख्या 20 लाखांवर पोहोचणार आहे. भारत सरकारचा महत्वाचा उपक्रम असलेल्या विकसित भारत अभियानात एनसीसी ने बजावलेल्या भूमिकेचा त्यांनी विशेष उल्लेख केला. ते म्हणाले, "युवा शक्ती – विकसित भारत' चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, एनसीसी आजच्या तरुणांना उद्याचे जबाबदार नागरिक बनवण्याचे अथक प्रयत्न करत आहे."
संस्थेच्या 76 व्या स्थापना दिनानिमित्त, कॅडेट्स विविध शहरांमध्ये आयोजित संचालनात सहभागी होत असून, विविध सांस्कृतिक उपक्रमांमध्ये भाग घेतील. परंपरेनुसार, एनसीसी दिवस संपूर्ण भारतात साजरा केला जाणार असून, देशभरात ‘रक्तदान शिबिर’ आयोजित केले जाईल. यंदाचे रक्तदान गेल्या वर्षीच्या 50,000 युनिट रक्तदानाचा टप्पा पार करेल, अशी आशा आहे. याशिवाय, वृक्षारोपण मोहीम, पुतळ्यांची स्वच्छता, स्वच्छता ही सेवा, नशा मुक्ती अभियान असे विविध सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
एनसीसीच्या विस्ताराचे उद्दिष्ट ठेवण्याव्यतिरिक्त, एनसीसी कॅडेट्सचा अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण यामध्ये देखील एक विशिष्ट उद्दिष्ट आणि कौशल्य मंथन, I4C (सायबर जनजागृती), कल्पना आणि नवोन्मेश, यासारख्या विविध सरकारी उपक्रमांचे परिणाम लक्षात घेऊन सुधारणा करण्यात आली आहे.
कॅडेट्सचे उत्तम चारित्र्य घडवून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने अभ्यासक्रमातील बदल करण्यात आला असून, तो विकसित भारताच्या’ उद्दिष्टपूर्ती कडे घेऊन जाईल.
***
S.Patil/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2076476)
Visitor Counter : 4