माहिती आणि प्रसारण मंत्रालय
“मला माझ्या चित्रपटाद्वारे माझ्या राष्ट्राची अस्सलपणाची होत असलेली हानी दाखवायची होती:” 'द स्लगार्ड क्लॅन' चे दिग्दर्शक रास्टिस्लाव बोरोस यांचे मनोगत
"स्थापितांना सुसंगत वाटत नसलेल्या कल्पना आणि चित्रपटांना निधी उभारणे कठीण जाते:" बेल्किस बायरॅक
"स्वतंत्र आणि तटस्थ सिनेमाला निधी मिळत नाही’’: फाइज अझीझखानी
#IFFIWood, 23 नोव्हेंबर 2024
वाढत्या भांडवलशाही आणि उपभोगवादामुळे स्लोव्हाकिया हे एक युवा राष्ट्र आपला अस्सलपणा गमावत आहे, याविषयीची खंत 'द स्लगार्ड क्लॅन' या चित्रपटाचे दिग्दर्शक रास्टिस्लाव बोरोस यांनी आज व्यक्त केली. भारताच्या 55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात – इफ्फीमध्ये त्यांनी प्रसार माध्यमातील प्रतिनिधींशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले, “मला माझ्या राष्ट्राचा आत्मा दाखवायचा होता. हा एक अतिशय तरुण देश आहे. त्याला स्वातंत्र्य मिळून फार काळ लोटला नाही. मला चित्रपटातून काहीतरी अस्सल दाखवायचे होते. म्हणून, मी वास्तव दाखवायचे नाही तर एक रूपक मांडायचे ठरवले. माझ्या देशासाठी हे एक स्वप्न आहे. देशातील तरुणांच्या सर्व आकांक्षा उपभोगवादावर आधारित आहेत.
या संवाद कार्यक्रमामध्ये बेल्किस बायरॅक यांनी आपल्या ‘गुलीझार’ या चित्रपटाविषयी बोलताना सांगितले, चित्रपट बनवताना निधीसाठी खूप संघर्ष करावा, लागल्याची माहिती दिली. “बहुधा पूर्वग्रहामुळेच चित्रपटासाठी निधी मिळण्यावर परिणाम होतो, असेही त्या म्हणाल्या. ‘मॅनस्पलेनिंग’ उद्योगातून येते, सांस्कृतिक संस्थांमधून नाही, असे सांगून त्या पुढे म्हणाल्या, “जर तुम्ही समाजातील कोणत्याही घटकाला विरोध करणाऱ्या कल्पना मांडत असाल तर मग, तुमच्यापुढे अनेक आव्हाने येणारच आहेत.”
या महोत्सवामध्ये दाखवण्यात आलेला, "फीयर अॅंड ट्रेम्बलिंग’’ हाँ चित्रपट मनिजेह हेकमत आणि फाइज अजीजखानी यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटामध्ये एका महिलेचा कथा सांगितली आहे. या महिलेचा अढळ विश्वास तिला एकाकीपणाकडे घेऊन जातो. कौटुंबिक आणि सामाजिक संबंधांपासून ती दूर होत जाजे. एखाद्या गोष्टीविषयी अगदी टोकाची खात्री असणे, हेच तिच्या एकाकीपणाचे मूळ कारण बनते. चित्रपटाच्या नावावरूनच हा चित्रपट बनवतानाचा अनुभव काय असू शकतो, हे सूचित करते, असेही फाइज अजीजखानी यांनी बोलताना सांगितले.
संवाद कार्यक्रमाच्या समारोपामध्ये आपले मत नोंदवताना, चित्रपट निर्मितीसाठी निधीविषयी बोलताना, अजीजखानी म्हणाल्या की, प्रस्थापितांना जर तुम्ही पाठिंबा देणारा सिनेमा काढला तर, निधी मिळतो; तथापि स्वतंत्र आणि तटस्थ सिनेमाला निधी मिळत नाही. मग अशावेळी सिनेमा काढण्यासाठी मित्र, कुटुंब आणि स्वतःच्या संसाधनांवर अवलंबून राहावे लागते.
इफ्फीमध्ये 'द स्लग्गार्ड क्लॅन', 'गुलिझार' आणि 'फियर अँड ट्रॅम्बलिंग' या तीन चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी आज गोव्यातील नयनरम्य वातावरणामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये पत्रकार परिषदेव्दारे प्रसार माध्यमातील प्रतिनिधींशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीयांका चॅटर्जी यांनी केले.
प्रस्तुत पत्रकार परिषद येथे पाहता येईल:
* * *
PIB IFFI CAST AND CREW | S.Patil/Suvarna/Darshana | IFFI 55
(Release ID: 2076473)
Visitor Counter : 8