माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
0 5

‘हनु-मॅन’: भारतीय पॅनरोमा मंचावर एक पौराणिक सुपरहिरोचा उदय


अर्थपूर्ण कथन देणे हे केवळ ध्येय नाही तर जबाबदारी : तेजा सज्जा

कथाकथनाच्या ध्‍यासामुळे प्रेक्षकांकडून आमच्या सिनेमाला भरभरून प्रतिसाद : तेजा सज्जा

हनुमानसदृश नायक जागतिक स्तरावर पोहोचला, स्‍वीकारला गेला आहेच, आता भारताने कथेचे नेतृत्व करण्याची वेळ : तेजा सज्जा

‘हनु-मॅन’ हा केवळ चित्रपट नाही; ही आपल्या सांस्कृतीच्या मुळांना आणि परंपरांना केलेले वंदना : तेजा सज्जा

#IFFIWood, 23 नोव्‍हेंबर 2024

 

गोवा इथे सुरू असलेल्‍या भारतीय आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्‍सवामध्‍ये  (इफ्फी),  इंडियन पॅनोरमा विभागात, प्रशांत वर्मा दिग्दर्शित मनमोहक सिनेमॅटिक प्रकल्‍प असलेल्‍या  ‘हनु-मॅन’  प्रदर्शन ‘शोकेस’मध्‍ये  झाले. अंजनाद्री या काल्पनिक गावाचा सेट उभा करून  चि‍त्रीत  केलेला हा चित्रपट हनुमंतू या एका किरकोळ, भूरट्या  चो-या करणा-याच्या  जीवनातील घटनांचा प्रवास दर्शवतो.  या हनुमंतूला   भगवान हनुमानाच्या रक्ताच्या जीवाश्म थेंबातून दैवी शक्ती प्राप्त होते. आणि त्याचे  परिवर्तन घडते. इथे हनुमंतू स्व-घोषित सुपरहिरो आहे.  पौराणिक कथा, धैर्य आणि मानवी गुंतागूंत अशी विविध वळणे घेत, चित्रपटामध्‍ये संघर्षाची पायरी येते.

हनुमंतूची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता तेजा सज्जा याने भारतीय पौराणिक कथांमध्ये रुजलेली कथा पुढे नेण्याची जबाबदारी पार पाडली आहे. या चित्रपटाच्या  निर्मितीविषयी त्‍यांनी अनेक गोष्‍टी सामायिक केल्या.  तुलनेने भव्‍य  प्रमाणावर दृश्‍य  तयार करण्यासाठी निर्मिती टीमने बजेटच्या अडचणींवर मात कशी केली, हेही त्यांनी सांगितले. अंजनाद्री या काल्पनिक परंतु नयनरम्य गावाचा पूर्ण सेट हैदराबादमध्‍ये तयार करण्यात आला होता. या चित्रपटामध्‍ये दिसणारे ते गाव, चित्रपट निर्मात्यांच्या कल्पकतेचे प्रदर्शन करणारे आहे, असेही तेजा यांनी सांगितले.

यावेळी तेजा यांनी  चित्रपटामागील सर्जनशील दृष्टीकोनावर प्रकाश टाकला, तीन वर्षांच्या निर्मितीच्या प्रवासात दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांची  चिकाटी आणि उत्कटतेला त्यांनी पूर्ण श्रेय दिले. हा चित्रपट केवळ भारताच्‍या  पौराणिक कथांपर्यंत पाहोचतो असे नाही,  तर भारतीय चित्रपटाला जागतिक व्यासपीठावर कसे स्थान देतो यावर त्यांनी प्रकाश टाकला.

यावेळी बोलताना तेजा सज्जा यांनी भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेले एक पात्र चित्रीत केल्याबद्दल अभिमान व्यक्त केला आणि तत्सम पौराणिक व्यक्तिमत्त्वांशी परिचित असलेल्या आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांनाही ते पात्र आपलेसे वाटणारे आहे, असे ते म्हणाले.  ‘हनु-मॅन’चा मोठ्या स्‍वरूपामध्ये विस्तारित करण्याच्या योजना देखील, त्यांनी सांगितल्‍या.  तेजा यांनी आता एका ‘सिक्वेल’ वर काम सुरू असल्याचे सांगितले. त्यामध्‍ये आणखी भव्य कथा सादर केली जाईल, असे  वचनही त्यांनी  दिले. कथेला पुढे नेण्यात स्त्री पात्रांची  निर्णायक भूमिका लक्षात घेऊन, त्यांनी चित्रपटामध्‍ये अत्यंत उत्तम आखिव- रे‍खीव अशा पद्धतीने  या महिला पात्रांच्‍या   लेखनावर  भर दिला असल्याचे सांगितले.

या अभिनेत्याने भारतीय सिनेमाच्या भवितव्याबद्दलचा आपण खूप आशावादी असल्याचे सांगितले. सिनेमा सातत्याने वाढतो, याचे कारण म्हणजे,  कथाकथनावरील प्रेक्षकांचे अतूट प्रेम आहे, असे तेजा सज्जा म्हणाले.  हे सांगताना त्यांनी टिपणी केली की,  भरभराट होत असलेला तेलुगू चित्रपट उद्योग नाविन्यपूर्ण कथनामुळे आकर्षक कामगिरी करीत आहे आणि येणारे अनेक  अडथळे पार करीत  आहे. हाच कल भारतीय चित्रपटांना  आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण करून देईल,  अशी आशा आहे, असेही तेजा म्हणाले.

‘हनु-मॅन’  सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक कथाकथनाचे  शक्तिशाली मिश्रणाचे प्रतिनिधित्व करतो.  या सिनेमाचा  उद्देश भारत आणि परदेशातील प्रेक्षकांना मोहित करण्याचा आहे. भारतीय पॅनोरमा विभागात त्याचा समावेश चित्रपटाच्या कलात्मक आणि सांस्कृतिक महत्त्वाची पुष्टी करतो.

तेजा सज्जा यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश चोपडे यांनी केले.

प्रस्तुत संपूर्ण पत्रकार परिषद येथे पाहता येईल :

 

* * *

PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Suvarna/Darshana | IFFI 55

iffi reel

(Release ID: 2076438) Visitor Counter : 11