माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
0 4

कारकेन ही एक मुक्तीची कथा आहे; तुमचा आतला आवाज शोधण्यासाठी केलेला प्रवास: दिग्दर्शक नेनदिंग लोडर


चित्रपटात एखाद्या गुंडामध्ये परिवर्तन घडवण्याचे सामर्थ्य असते: ‘जिगरथंडा डबल एक्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक कार्तिक सुब्बराज

‘बट्टो का बुलबुला’ ची कथा हरियाणातील ग्रामीण जीवनात खोलवर रुजलेली आहे: संकलक सक्षम यादव

#IFFIWood, 23 नोव्‍हेंबर 2024

 

गोवा येथे आयोजित 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (इफ्फी) उत्साहपूर्ण पत्रकार परिषदेत सहभागी होण्यासाठी आज बट्टो का बुलबुला, कार्केन आणि जिगरथंडा डबल एक्स या चित्रपटांतील कलाकार आणि इतर तंत्रज्ञ एकत्र आले. या चित्रपट निर्मात्यांनी आपापला सर्जनशील प्रवास, निर्मितीदरम्यान उभी ठाकलेली आव्हाने तसेच चित्रपट माध्यमाच्या भविष्याबाबतच्या संकल्पना  यासंदर्भात मौलिक विचार मांडले.

कारकेन –उत्कटता आणि मुक्तीचा प्रवास

'कारकेन' या चित्रपटाचे दिग्दर्शक नेनदिंग लोडर या चित्रपटाविषयी अत्यंत उत्कटतेने बोलले. समाजाच्या अपेक्षा आणि वैयक्तिक इच्छा यांच्यामध्ये पिचलेल्या व्यक्तीचा अंतर्गत संघर्ष या चित्रपटातून दिसतो. ही एक मुक्तीची कथा आहे; तुमचा आतला आवाज शोधण्यासाठी केलेला हा प्रवास आहे,” असे लोडर यांनी सांगितले. 

अरुणाचल प्रदेशात चित्रीकरण करताना आलेल्या अडथळ्यांचा उल्लेख करत लोडर यांनी चित्रपट निर्मिती प्रक्रियेत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (एनएफडीसी) केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “अरुणाचल प्रदेशात अतुलनीय प्रतिभावंत आहेत मात्र उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांसाठी पुरेसे मंच उपलब्ध नाहीत. हा चित्रपट येणाऱ्या पिढ्यांतील चित्रपट निर्मात्यांना आपापल्या स्वप्नांचा पाठपुरावा करून त्यांच्या कथा सांगण्यासाठी प्रेरित करेल असा विश्वास मला वाटतो,” ते पुढे म्हणाले.

सिनेमॅटोग्राफर न्यागो यांनी एका पात्रासह मर्यादित अवकाशात चित्रीकरण करण्याचा अनुभव सामायिक केला. ते म्हणाले की याआधी त्यांनी अशा प्रकारच्या आव्हानाला कधीच तोंड दिले नव्हते. “एक सिनेमॅटोग्राफर म्हणून माझ्या मर्यादा ताणून धरणारा हा एक अनोखा अनुभव होता,” ते म्हणाले.

‘जिगरथंडा डबल एक्स’ : चित्रपटात एखाद्या गुंडामध्ये परिवर्तन घडवण्याचे सामर्थ्य असते.  

जिगरथंडा डबल एक्स या चित्रपटाची निर्मिती करणारे दूरदर्शी दिग्दर्शक कार्तिक सुब्बराज यांनी ‘चित्रपटात असलेले सामाजिक बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य’ या चित्रपटाच्या संकल्पनेबाबत विचार मांडले. “चित्रपट हे समाजात बदल घडवून आणण्यासाठीचे उत्तम शास्त्र आहे. एखाद्या गुंडामध्ये देखील परिवर्तन घडवण्याचे सामर्थ्य चित्रपटात असते,” सुब्बराज म्हणाले. हा चित्रपट मनुष्य आणि प्राणी यांना जोडणाऱ्या धाग्याच्या पार्श्वभूमीवर या दोघांतील नातेसंबंधांचा शोध घेतो यावर त्यांनी अधिक भर दिला. मुख्य प्रवाहातील व्यावसायिक चित्रपट आणि कलात्मक चित्रपट यांना विभागणारी सीमारेषा धूसर करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. “मुख्य प्रवाहातील चित्रपटात असणारे मनोरंजन आणि कलात्मक चित्रपटाची खोली तसेच अर्थगर्भता  यांचे मिश्रण करून हा चित्रपट दोन जगांना एकमेकांशी जोडतो,” त्यांनी सांगितले.  

‘बट्टो का बुलबुला’ - हरियाणातील ग्रामीण जीवनाचा उत्सव खोलवर रुजलेली आहे:

बट्टो का बुलबुला या चित्रपटाचे संकलक सक्षम यादव यांनी या कार्यक्रमात निर्मिती-पश्चात काळात, विशेषतः चित्रपटांच्या लांबलेल्या शॉटदरम्यान समोर उभ्या राहिलेल्या अनोख्या आव्हानांची चर्चा केली. “एखाद्या शॉटची लांबी योग्य राखताना चित्रपटाची मूळ मोहिनी कायम ठेवणे हे आमच्यासमोरील मुख्य आव्हान होते,” असे यादव म्हणाले.

चित्रपटाचे डीओपी  म्हणजेच डायरेक्टर आॅफ फोटोग्राफी,आर्यन सिंग, यांनी  चित्रपटातील खरेखरेपणाबाबत  टीमच्‍या  बांधिलकीचे महत्त्व विशद केले, तसेच स्पष्ट केले की, ही  कथा हरियाणाच्या ग्रामीण जीवनात खोलवर रुजलेली आहे. "ग्रामीण जीवनाचे सार वास्तविक, वाटेल अशा प्रकारे ते चित्रीत करणे हे आमचे ध्येय होते," असेही  सिंग यांनी सांगितले.

चित्रपटाविषयी माहिती:

1.बट्टो का बुलबुला

रंगीत | 35’ | हरियानवी | 2024

सारांश- चित्रपटाची रूपरेषा

हरियाणाच्या एका लहानशा  गावात, म्हातारा बट्टो  मित्र सुलतानसोबत दिवस घालवत असतो. तो अनेकदा मद्यपान करीत असतो. आपली बहुतेक जमीन विकून, बट्टोने गाव सोडण्यासाठी शेवटचा तुकडा विकण्याची योजना आखलेली असते.  हेराफेरी करणारा दत्तक मुलगा बिट्टू  हा या वृध्‍द बट्टोच्या जमिनीवर डोळा ठेवून असतो. बट्टोने ही जमीन आपल्‍याला द्यावी म्हणून बिट्टू  दबाव टाकतो, त्यामुळे त्याचा भावनिक गोंधळ उडतो. सुलतान चिकाटीने सत्याचा शोध घेतो.  यामध्‍ये चित्रपटातील पात्रांमध्‍ये   निर्माण झालेल्‍या  तणावाचे  प्रदर्शन प्रेक्षकांना  होते. शेवटी, बट्टोला खऱ्या मैत्रीची ताकद कळते. आणि तो मैत्रीचे महत्व जाणून निर्णय घेतो.

कलाकार आणि सहकर्मी

दिग्दर्शक : अक्षय भारद्वाज

निर्माता: दादा लखमी चंद स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ परफॉर्मिंग अँड व्हिज्युअल आर्ट्स (DLC Supva).

सिनेमॅटोग्राफर : अक्षय भारद्वाज

पटकथा लेखक : रजत कारिया

संपादक: सक्षम यादव

कलाकार: कृष्‍णन नाटक

सिनेमॅटोग्राफर : अक्षय भारद्वाज

 

2.कारकेन

रंगीत  |  92 '  | गॅलो | 2024

सारांश – रूपरेषा

अभिनयाची आवड असलेल्‍या एक  वैद्यकीय अधिकारी असतो.  परंतु त्याला आपले अभिनय करण्‍याचे  स्वप्न सोडून द्यावे लागते. काही वर्षांनी  तो एकदा ऑडिशन देण्यासाठी उभा राहतो. या निर्णयामुळे त्याच्या कुटुंबाच्या कर्जाला आधार देणारी त्याची नोकरी धोक्यात येऊ शकते. अभिनयाच्‍या बेभरवशा व्‍यवसायामुळे त्‍याच्‍यापुढे आर्थिक समस्‍या  येण्‍याचा धोका निर्माण होवू शकतो. या सगळ्या गंभीर परिस्थितीत एका गर्भवती महिलेचा जीव धोक्यात येण्‍याचा प्रसंग ओढवतो.

 

कलाकार आणि सहकर्मी

दिग्दर्शक: नेंडिंग लोडेर

निर्माता: नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.

सिनेमॅटोग्राफर: न्यागो एटे

संपादक: लोडम गोंगो

पटकथा लेखक: नेंडिंग लोडर

कलाकार: नेंडिंग लोडर

 

3. जिगरथंडा डबल एक्स

रंगीत  | 172' | तमिळ | 2023

सारांश- रूपरेषा

जिगरथंडा डबल एक्स हा तमिळ ॲक्शन थ्रिलर आणि कार्तिक सुब्बाराज दिग्दर्शित 2014 च्या जिगरथंडा चित्रपटाचा अध्यात्मिक ‘प्रीक्वल’ आहे. हे कथानक महत्त्वाकांक्षी पोलीस अधिकारी किरुबाई अरोईयाराज यांच्यावरून प्रेरणा घेवून लिहिले आहे. या पोलिस अधिका-याला  आपली नोकरी सुरक्षित करण्यासाठी बेकायदेशीर कृत्य करण्यास भाग पाडले जाते. स्वतःला चित्रपट दिग्दर्शकाचा वेष धारण करून, तो गँगस्टर एलियस सीझरच्या अड्ड्यामध्‍ये घुसतो. हत्येच्या अनेक प्रयत्नांनंतर,  कुख्यात सराईत गुन्हेगार शेट्टानीच्या विरोधात सीझरला खडे फोडण्यासाठी पाठवण्‍याची  योजना आखतो. या प्रक्रियेत, सीझरच्या  हृदयपरिवर्तनाचा अनुभव त्याला  येतो आणि शेट्टानीचा पराभव करून लोकांना मदत करतो. राज्याचा प्रमुख एका घोटाळ्यात गुंतल्याचे उघड होते. सीझर अंतिम त्याग करतो आणि पोलिस अधिकारी सत्य सर्वांसमोर आणून  आपला चित्रपट पूर्ण करतो. एक आकर्षक कथा, महत्वाकांक्षा, नैतिकता आणि जगण्यासाठी सर्व करण्‍याची तयारी, याचे दर्शन चित्रपटातून होते. कथाकथनाची पद्धत अतिशय टोकदार आहे.

 

कलाकार आणि सहकर्मी

दिग्दर्शक: कार्तिक सुब्बाराज

निर्माता: स्टोन बेंच प्रा. लि.

सिनेमॅटोग्राफर: एस थिरुनावुकारासू

संपादक: शफीक मोहम्मद अली

पटकथा लेखक: कार्तिक सुब्बाराज

कलाकार: राघव लॉरेन्स, गणेश, एस.जे. सूर्या, निमिषा सजायन, इलावरसू, नवीन चंद्र, सत्यान, संचना नटराजन, शाइन टॉम चाको, अरविंद आकाश

संपूर्ण पत्रकार परिषद येथे पहाता येईल :

 

* * *

PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Sanjana/Suvarna/Darshana | IFFI 55

iffi reel

(Release ID: 2076384) Visitor Counter : 11