माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
0 4

"सिनेमा आणि साहित्य यांचा आलेख जितका जवळ येईल तितका भारतीय सिनेमा चांगला होईल" - 55 व्या इफ्फीमध्ये चित्रपट निर्माते मणिरत्नम यांचे प्रतिपादन


मणिरत्नम यांनी इफ्फी मास्टरक्लासमध्ये गौतम व्ही. मेनन यांच्याशी संवाद साधताना तरुण चित्रपट निर्मात्यांना दिली प्रेरणा

#IFFIWood, 22 नोव्‍हेंबर 2024

 

दिग्गज चित्रपट निर्माते मणिरत्नम यांनी 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्‍ये (इफ्फी) "उत्कृष्ट साहित्यिक आदर्शांचे आकर्षक चित्रपटांमध्ये रूपांतर" या विषयावरील मास्टरक्लासमध्ये प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. आणखी एक प्रख्यात भारतीय चित्रपट दिग्दर्शक गौतम व्ही. मेनन यांच्याशी अंतर्दृष्टीपूर्ण संवाद साधून मणिरत्नम यांनी साहित्याचे चित्रपटात रूपांतर करण्याच्या कलेचा अभ्यास सादर केला आणि चित्रपट निर्मात्यांना आणि सिनेकलाकारांनाही मौल्यवान सल्ले दिले.

“मी अजूनही श्रोत्यांमध्ये बसलेली एक व्यक्ती आहे,” असे मणिरत्नमने नम्रपणे मनोगत व्‍यक्त केले.  चित्रपट सृष्टीतील  ‘उस्ताद’  असूनही, ते म्हणाले , "अनेक मार्गांनी, मी स्‍वत:ला  अजूनही नवशिकाच  समजत असतो" यामधून त्यांना  आयुष्यभर असलेली  उत्सुकता आणि कथाकथनाची आवड दिसून आली.

"सिनेमा आणि साहित्याचा आलेख जितका जवळ येईल,  तितका भारतीय चित्रपट अधिक चांगला होईल" असे प्रतिपादन करून मणिरत्नम यांनी सिनेमा आणि साहित्य यांच्यातील गहन संबंधावर प्रकाश टाकला. चित्रपट निर्मात्यांनी लिखित शब्दांना आकर्षक दृश्‍यात्मक  कथनात रूपांतरित करण्याची नाजूक कला विकसित केली पाहिजे,  यावर त्यांनी भर दिला.

 

साहित्याला पडद्यावर जिवंत करणे

पुस्तकांचे चित्रपटांमध्ये रुपांतर करण्याच्या बारकाव्यांबद्दल चर्चा करताना मणिरत्नम यांनी स्पष्ट केले, “चित्रपट हे दृश्य माध्यम आहे, तर पुस्तके ही मुख्यत्वे काल्पनाधिष्ठीत  असतात. चित्रपट निर्मात्याने वाचकांच्या कल्पनाशक्तीला जिवंत करण्यासाठी अधिक सावध असणे आवश्यक आहे. त्यांनी नमूद केले की, स्क्रिप्टमध्ये समायोजन आवश्यक असले तरी, या बदलांमुळे कथेचे मूळ सार बदलण्याऐवजी ती  समायोजकता वाढवली पाहिजे.

मणिरत्नम यांनी  पौराणिक कथा आणि प्राचीन भारतीय इतिहासाने त्यांच्या दृष्टीकोनावर कसा प्रभाव टाकला आहे, हेही सामायिक केले.  त्‍यामुळे आपण अनोख्या  मार्गांनी पात्रांकडे जाण्यास सक्षम झालो, असे ते म्हणाले. अभिनेते स्क्रिप्टसह नैसर्गिकरित्या परफॉर्म करू शकतील, याविषयी  खात्री  असली तरी  त्यांनी फुलांसारख्या साहित्यिक भाषेला सिनेमॅटिक पटकथेमध्ये रूपांतरित करताना येणा-या  आव्हानांवर त्यांनी भाष्य केले.

कल्की कृष्णमूर्तीच्या 1955 च्या त्याच नावाच्या प्रतिष्ठित कादंबरीतून रूपांतरित केलेल्या त्यांच्या अलीकडील एक उत्कृष्ट रचना ठरलेल्‍या 'पोनियिन सेल्वन'बद्दल चर्चा करताना, मणिरत्नम यांनी चित्रपटात चोल काळाचे चित्रण कसे करायचे होते यावर प्रकाश टाकला. तंजावरमध्ये त्या काळातील सर्व अवशेष  हरवले गेले होते. मात्र  आपल्‍याला  विस्तृत सेट्स बनवायचे नसल्यामुळे, उत्तर भारतामध्ये चित्रपटाचे शूटिंग करण्याचे स्वातंत्र्य घेतले आणि तेथील वास्तुकलेचे रूपांतर चोल काळातील  वास्तुकलेसारखे करून घेतले.

 

चित्रपट ही एक सहयोगाने बनणारी कला

सिनेमाचे सहयोगी स्वरूप अधोरेखित करताना, मणिरत्नम यांनी टिप्पणी केली, "दिग्दर्शक म्हणून, माझे काम चित्रपटातील प्रत्येक व्यक्तीला, मग तो अभिनेता असो किंवा कार्यरत असलेला सहकारी सदस्‍य असो , त्‍या सर्वांना  एका केंद्रबिंदूवर आणणे हे आहे."

या मास्टरक्लासने प्रेक्षकांना एक समृद्ध अनुभव प्रदान केला, मणिरत्नम यांनी  तरुण चित्रपट निर्मात्यांना विचारपूर्वक सर्जनशीलतेचे  स्वातंत्र्य घेण्याचे आवाहन केले. त्यांनी   पुस्तकाचा मूळ भाव जपून ठेवण्यास सांगितले आणि  त्याच्‍या  अनोख्या सर्जनशील रुपांतरासाठी मंथन करण्‍याचा सल्ला दिला.

हा मास्टरक्लास या चित्रपट निर्मात्याच्या निपुणतेचा आणि नम्रतेचा पुरावा होता.  प्रेक्षकांमधील सर्व महत्त्वाकांक्षी कथाकारांना साहित्य आणि सिनेमा या दोन जगांचे एकमेकांशी  कसे संबंध जोडायचे याचे उत्तम मौल्यवान धडे त्यांनी दिले.

 

* * *

PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Suvarna/Darshana | IFFI 55

iffi reel

(Release ID: 2076322) Visitor Counter : 9