माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
0 4

ताश्कंद ते बेलग्रेड: 55 व्या इफ्फीमध्ये सीमा आणि संस्कृतींच्या पलिकडील कथांचा उत्सव साजरा केला जातो


सीमारहित सिनेमा : 55 व्या इफ्फीमध्ये उझबेकिस्तान आणि सर्बिया यांनी मानवी संबंध अधिक मजबूत केले

सिनेमा ही एक सशक्त भाषा आहे जी दरी सांधते : बोरिस गट्स, सर्बियन चित्रपट निर्माता

मानवी नातेसंबंधातील प्रामाणिकपणा हा आमच्या कथांचा गाभा आहे: उझबेक चित्रपट निर्माता जमशीद नारझिकुलोव्ह

"द फ्युचर इज नाऊ": उत्तम भविष्य घडवण्यात सिनेमाची भूमिका दिग्दर्शकांनी केली अधोरेखित

#IFFIWood, 22 नोव्‍हेंबर 2024

 

55 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात  (इफ्फी) उझबेकिस्तान, एस्टोनिया आणि सर्बियामधील तीन उल्लेखनीय  चित्रपट अभिमानाने प्रदर्शित केले जाणार आहेत.  दूरदर्शी दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी तयार केलेले हे सुंदर चित्रपट लवचिकता, आत्म-शोध आणि अदम्य मानवी भावनांच्या संकल्पनेचा शोध घेतात,  जे  प्रेक्षकांना विविध सांस्कृतिक परिदृश्यांच्या माध्यमातून उत्कट प्रवासासाठी आमंत्रित करतात.

यातील ठळक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे 'द सॉन्ग सस्टक्सोटिन' ही दुष्काळग्रस्त उझबेक गावात चित्रित  एक मार्मिक कथा आहे.  आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त खुस्नोरा रोझमाटोवा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट निसर्गाचा कोप आणि सामाजिक नैराश्य  विरोधात समुदायाने दिलेला लढा आहे. काझान आंतरराष्ट्रीय  मुस्लिम चित्रपट महोत्सवात "मानवतावादासाठी" पुरस्काराने सन्मानित, रोझमाटोव्हा यांनी मानवतावादी कथाकथनाप्रति आपली अतूट बांधिलकी दाखवून एक अनोखा चित्रपट दिला  आहे.

जमशीद नारझिकुलोव दिग्दर्शित 'शोकेस इज हाऊस' ही उझबेकिस्तानमधील एक मार्मिक  कथा आहे. ही कथा एका शोकाकुल विधवेची आहे जिने आपला एकुलता एक मुलगा एका अविवेकी  ऑनलाइन आव्हानात गमावला.  न्यायासाठी तिने केलेला पाठपुरावा तिला एका शांत गावातून एका विशाल महानगराच्या अराजकतेकडे घेऊन जातो, जिथे ती तिची शक्ती आणि मूल्ये यांचा पुन्हा  शोध घेत असताना तिला कठोर वास्तवांचा सामना करावा लागतो. पदार्पणातील हा पहिला चित्रपट नार्झिकुलोव्हच्या बारकाईने कथा कथनाचा प्रयत्न अधोरेखित करतो; वैयक्तिक शोकांतिकेची परिवर्तनशील आत्म-शोधाशी सांगड घालतो.

एस्टोनिया आणि सर्बिया मधील 'डेफ लव्हर्स' हा बोरिस गट्स या एका  प्रसिद्ध रशियन निर्मात्याने दिग्दर्शित केलेला प्रयोगशील चित्रपट आहे. इस्तंबूलमध्ये घडत असलेल्या या  समकालीन कथेत  सोन्या युक्रेनियन, आणि दान्या रशियन दाखवली असून  ते दुसऱ्या  शहरात जगण्याची सामायिक आव्हाने,  संघर्ष आणि आकांक्षा यांच्याशी झुंजत मार्गक्रमण करतात. अशांत भूतकाळ पाठीशी असलेला त्यांचा प्रवास ओळख, लवचिकता आणि  सामायिक भविष्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न आहे. दारिद्र्य, वर्णद्वेष आणि दुर्धर आजार यांसारख्या गंभीर समस्यांप्रति   आपला निर्भय दृष्टीकोन ठेवून   या आंतरराष्ट्रीय प्रीमियरमध्ये त्याने त्याच्या चित्रपटाची खोली  आणि दूरदृष्टी यांचा परिचय घडवला आहे.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना, बोरिस गट्स यांनी युद्धग्रस्त पार्श्वभूमीतही दरी सांधण्याचे सामर्थ्य असलेली मजबूत भाषा म्हणून सिनेमाचे महत्त्व अधोरेखित केले.

करीम या पुरस्कार विजेत्या चित्रपट दिग्दर्शकाने प्रेक्षकांच्या प्रश्नाला उत्तर देताना, सीमेपलीकडील लोकांना एकत्र आणण्यात  आणि मतभेद दूर करण्यात तसेच सामायिक कथांद्वारे मानवतेला जवळ आणण्यात  चित्रपटांची  महत्वपूर्ण भूमिका असल्यावर भर दिला.

"उत्तम भविष्याच्या उभारणी" मधील  सिनेमाच्या भूमिकेवरही दिग्दर्शकांनी भर दिला.

एकूणच हे चित्रपट सीमा ओलांडून, संस्कृतींशी जोडण्याची आणि मानवी स्थितीच्या गुंतागुंतीचा शोध घेण्याची सिनेमाची सार्वत्रिक शक्ती प्रदर्शित करतात. कथा सादरीकरणाच्या त्यांच्या अनोख्या शैलीने, महत्वपूर्ण कथानक आणि कलात्मक प्रतिभेसह ते इफ्फी 2024 मध्ये प्रेक्षकांवर अमिट ठसा सोडण्याची ग्वाही देतात.

 

* * *

PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Sushma/Darshana | IFFI 55

iffi reel

(Release ID: 2076066) Visitor Counter : 12