पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान सुरीनामच्या राष्ट्रपतींना भेटले
Posted On:
21 NOV 2024 10:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2024
गयाना मधील जॉर्जटाऊन येथे आयोजित दुसऱ्या भारत-कॅरीकॉम शिखर परिषदेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 नोव्हेंबर रोजी सुरीनामचे राष्ट्रपती चंद्रिका प्रसाद संतोखी यांची भेट घेतली.
दोन्ही नेत्यांनी यावेळी विद्यमान द्विपक्षीय उपक्रमांचा आढावा घेतला तसेच त्यांनी संरक्षण आणि सुरक्षा, व्यापार आणि वाणिज्य, कृषी, युपीआय आणि आयसीटी यांसारखे डिजिटल उपक्रम, आरोग्यसेवा आणि औषधनिर्मिती, क्षमता निर्मिती, संस्कृती आणि दोन्ही देशांतील जनतेमधील परस्पर संबंध यांसह अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक वाढवण्यावर सहमती व्यक्त केली. सुरीनामला विकासविषयक सहकार्यासाठी विशेषतः समुदाय विकास प्रकल्प, अन्न सुरक्षा विषयक उपक्रम आणि लघु तसेच मध्यम उद्योग या क्षेत्रांमध्ये भारत देत असलेल्या सातत्यपूर्ण पाठींब्याबद्दल राष्ट्रपती संतोखी यांनी कौतुक व्यक्त केले.
दोन्ही नेत्यांनी यावेळी क्षेत्रीय तसेच जागतिक घडामोडींबाबत आपापली मते देखील मांडली.संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील भारताच्या सदस्यत्वाला सुरीनामने दिलेल्या पाठींब्याबद्दल पंतप्रधानांनी राष्ट्रपती संतोखी यांचे आभार मानले.
S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2075980)
Visitor Counter : 6