पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी ,सेंट लुसियाच्या पंतप्रधानांची घेतली भेट

प्रविष्टि तिथि: 22 NOV 2024 12:31AM by PIB Mumbai

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 20 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या इंडिया-कॅरिकॉम शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर,सेंट लुसियाचे पंतप्रधान महामहीम श्री.  फिलिप जे. पियरे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत  यशस्वीपणे चर्चा केली.  

दोन्ही नेत्यांनी क्षमता विकास, शिक्षण, आरोग्य, अक्षय ऊर्जा, क्रिकेट आणि योग यासह अनेक मुद्द्यांवरील द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा केली.भारत- कॅरिकॉम भागीदारी मजबूत करण्यासाठी पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या सात कलमी योजनेची पंतप्रधान पियरे यांनी प्रशंसा केली.

दोन्ही नेत्यांनी आकाराने लहान असलेल्या द्वीप राष्ट्रांसाठी आपत्ती व्यवस्थापन क्षमता आणि विरोध करण्याची क्षमता मजबूत करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करून, हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.

***

JPS/SP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2075835) आगंतुक पटल : 83
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam