पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी शाश्वत विकास आणि उर्जा स्थित्यंतरावर आधारित जी20 सत्राला संबोधित केले
प्रविष्टि तिथि:
20 NOV 2024 1:34AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी20 शिखर परिषदेतील शाश्वत विकास आणि उर्जा स्थित्यंतरावर आधारित सत्राला संबोधित केले. नवी दिल्ली येथे आयोजित जी 20 शिखर परिषदेदरम्यान या गटाने वर्ष 2030 पर्यंत नवीकरणीय उर्जा क्षमता तिप्पट करण्याचा आणि उर्जा कार्यक्षमता दर दुप्पट करण्याचा संकल्प केला होता याचा त्यांनी उल्लेख केला. या शाश्वत विकासविषयक प्राधान्यक्रमांना पुढे नेण्याच्या ब्राझीलच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले.
शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी भारताने उचललेल्या पावलांविषयी पंतप्रधानांनी तपशीलवार माहिती दिली. ते म्हणाले की गेल्या 10 वर्षांत भारताने 40 दशलक्ष कुटुंबांना घरे दिली; गेल्या 5 वर्षांत 120 दशलक्ष घरांमध्ये स्वच्छ पेयजलाचा पुरवठा सुरु केला;100 दशलक्ष कुटुंबांना स्वयंपाकाचे स्वच्छ इंधन उपलब्ध करून दिले आणि 115 दशलक्ष कुटुंबांसाठी शौचालये बांधून दिली.
पॅरिस करारातील वचनांची पूर्तता करणारा भारत हा जी 20 गटातील पहिला देश ठरला आहे हे ठळकपणे नमूद करत पंतप्रधान मोदी म्हणाले की भारताने वर्ष 2030 पर्यंत 500 गिगावॅट नवीकरणीय उर्जा निर्माण करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य निश्चित केले असून त्यापैकी आतापर्यंत 200 गिगावॅट ऊर्जानिर्मितीचे लक्ष्य साध्य करण्यात भारताने यश मिळवले आहे. नंतर त्यांनी भारताने हाती घेतलेल्या, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्तीप्रती लवचिक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आघाडी, एलआयएफई मोहीम, एक सूर्य एक विश्व एक ग्रीड तसेच शाश्वत ग्रहाची जोपासना करण्यासाठी जागतिक जैवइंधन आघाडी यांसारख्या जागतिक पातळीवरील उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. जगाच्या दक्षिणेकडील देशांच्या विशेषतः लहान बेट स्वरूपातील विकसनशील देशांच्या शाश्वत विकासविषयक गरजांना प्राधान्य देण्याचे आवाहन करत पंतप्रधानांनी जागतिक दक्षिणेतील देशांच्या तिसऱ्या शिखर परिषदेत भारताने जाहीर केलेल्या जागतिक विकास ध्येयांना पाठींबा देण्याचे आवाहन केले.
पंतप्रधानांचे संपूर्ण भाषण मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
* * *
JPS/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2074888)
आगंतुक पटल : 71
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam