माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इफ्फी 2024 मध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कार्यक्रमांच्या नेत्रदीपक मालिकेचे केले अनावरण; महोत्सवात गोव्याची संस्कृती आणि सिनेमॅटिक उत्कृष्टतेचे दर्शन घडणार
इफ्फी परेड दरम्यान गोव्याचा आसमंत आकाश कंदिलांनी उजळून निघेल: प्रमोद सावंत
क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो स्पर्धेसाठी विक्रमी 1032 प्रवेशिका प्राप्त : यावर्षी इफ्फीचा भर तरुण चित्रपट निर्मात्यांवर : प्रितुल कुमार, व्यवस्थापकीय संचालक एनएफडीसी
#IFFIWood, 18 नोव्हेंबर 2024
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (एनएफडीसी) माध्यमातून गोवा राज्य सरकारसोबत त्यांच्या एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा या संस्थेच्या माध्यमातून संयुक्तपणे गोवा येथे 20ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत 55 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव(इफ्फी)आयोजित करत आहे. या वर्षीचा महोत्सव चित्रपट रसिकांसाठी पर्वणी ठरणार असून वैविध्यपूर्ण कथा, नाविन्यपूर्ण विषय आणि सांस्कृतिक आदानप्रदानाला प्रोत्साहन देईल.
आज इफ्फी मीडिया सेंटर येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा च्या उपाध्यक्ष डेलियाह लोबो, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव आणि एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रितुल कुमार, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहसचिव वृंदा देसाई, आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालयाच्या (पीआयबी) महासंचालक स्मिता वत्स शर्मा आणि पीआयबी तसेच ईएसजी चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या वर्षीच्या नवीन उपक्रमांची माहिती देताना डॉ. सावंत यांनी सांगितले की, ‘स्काय लँटर्न’ (आकाशकंदील) स्पर्धेच्या प्रवेशिका इफ्फी परेडच्या मार्गावर प्रदर्शित केल्या जातील आणि सहभागींना रोख बक्षिसे दिली जातील. 22 नोव्हेंबर रोजी ईएसजी कार्यालय पासून ते कला अकादमीपर्यंत इफ्फी परेडचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवादरम्यान 81 देशांचे 180 आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखवले जाणार आहेत. महोत्सवाच्या ठिकाणी प्रवासाच्या सोयीसाठी मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. गोवन फिल्म्सवर एक विशेष विभाग असेल ज्यामध्ये 14 चित्रपट प्रदर्शित केले जातील आणि स्थानिक प्रतिभा आणि संस्कृतीचा उत्सव साजरा केला जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
गुगल आणि My Gov व्यासपीठांबरोबरच्या भागीदारीद्वारे महोत्सवातील युट्यूब इन्फ्लुऐंसरचे संगठन सुनिश्चित केले जात असल्याचे एन एफ डी सी चे व्यवस्थापकीय संचालक प्रिथुल कुमार यांनी सांगितले. फिल्म बाजारमध्ये ऑस्ट्रेलियन फिल्म पॅव्हेलियन प्रदर्शित केले जाणार आहे. या महोत्सवात विधू विनोद चोप्रा, ए. रहमान, विक्रांत मेसी, आर. माधवन, नील नितीन मुकेश, कीर्ती कुल्हारी, अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर, रकुल प्रीत सिंग, नुसरत भरुचा, सानया मल्होत्रा, इलियाना डिक्रूझ, बोमन इराणी, पंकज कपूर, अपारशक्ती खुराना, मानसी पारेख, प्रतिक गांधी, सई ताम्हणकर, विष्णू मंचू, प्रभुदेवा, काजल अग्रवाल, सौरभ शुक्ला यांच्यासह चित्रपट सृष्टीतील अनेक इतर नामवंत मंडळीही सहभागी होणार आहेत.
यावर्षी 6500 प्रतिनिधींची नोंदणी झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रतिनिधींच्या नोंदणीत 25 टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती प्रिथुल कुमार यांनी दिली. चित्रपट रसिकांना चित्रपट महोत्सवात चित्रपट पाहणे अधिक सुलभ बनवण्यासाठी या वर्षी आणखी 6 स्क्रीन आणि 45 टक्के अधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
पत्रकारांना चित्रपट व्यवसायाच्या सर्व आयामांशी परिचित करण्यासाठी तसेच पत्रकारांना चित्रपट उद्योगाच्या विविध पैलूंची सखोल माहिती देण्यासाठी पत्रकार दौरा आयोजित केला जाईल असेही प्रिथुल कुमार यांनी सांगितले. मिळवून दिली जाईल. इफ्फी 2024, युवा चित्रपट निर्मात्यांवर लक्ष केंद्रित करत असून यावर्षी CMOT विभागात विक्रमी 1032 प्रवेशिका दाखल झाले आहेत. गेल्या वर्षी या विभागात 550 प्रवेशिका दाखल झाल्या होत्या, असे कुमार यांनी सांगितले.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या पत्र सूचना कार्यालयाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांनी प्रसारमाध्यमांमध्ये महोत्सवाचे वाढते आकर्षण आणि प्रादेशिक प्रतिनिधित्व वाढवण्याच्या दृष्टीने केलेली महत्त्वपूर्ण प्रगती अधोरेखित केली. प्रसारमाध्यमांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याची माहिती त्यांनी दिली. प्रसारमाध्यमांकडून एकूण 840 अर्ज आले असून त्यापैकी 284 अर्ज गोव्यातील आहेत, असे त्यांनी सांगितले. देशातील सर्व राज्यांमध्ये महोत्सवाचा विस्तार करण्यासाठी, पत्र सूचना कार्यालयाची प्रादेशिक कार्यालये कोंकणी भाषेसह इतर संबंधित भाषांमध्ये प्रसिद्धी पत्रक जारी करणार आहेत.
एन एफ डी सी च्या व्यवस्थापकीय संचालकांचे पॉवरपॉईंट सादरीकरण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
* * *
PIB IFFI CAST AND CREW | S.Patil/Sushma/Shraddha/D.Rane | IFFI 55
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 2074434)
Visitor Counter : 35