पंतप्रधान कार्यालय
विकास आणि वारसा यासोबत अग्रेसर होण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोतः पंतप्रधान
ईगास उत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधानांच्या नागरिकांना शुभेच्छा
Posted On:
12 NOV 2024 7:05AM by PIB Mumbai
इगास उत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. विकास आणि वारसा यांच्या सोबत अग्रेसर होण्यासाठी भारत वचनबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले. विशेषतः उत्तराखंडच्या नागरिकांना शुभेच्छा देताना, त्यांनी देवभूमीच्या इगास महोत्सवाचा वारसा आणखी समृद्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला.
एक्सवर पोस्ट केलेल्या एका थ्रेडवर, त्यांनी लिहिलेः
“उत्तराखंडच्या माझ्या कुटुंबियांसह सर्व देशवासियांना इगास पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा! दिल्लीत आज मला देखील उत्तराखंडचे लोकसभा खासदार अनिल बलुनीजींकडे या उत्सवात सहभागी होण्याचे भाग्य लाभले. हे पर्व प्रत्येकाच्या जीवनात सुख-समृद्धी आणि आनंद घेऊन येवो, अशी मी कामना करतो @anil_baluni”
“आम्ही विकास आणि वारशाला सोबत घेऊन पुढे जाण्यासाठी वचनबद्ध आहोत. जवळपास लुप्तप्राय झालेले, लोकसंस्कृतीशी जोडलेले इगास पर्व पुन्हा एकदा उत्तराखंडच्या माझ्या कुटुंबियांच्या श्रद्धेचे केंद्र बनत आहे, याचे मला समाधान आहे.”
“उत्तराखंडच्या माझ्या बंधू-भगिनींनी इगास या परंपरेला ज्या प्रकारे जिवंत केले आहे, ते अतिशय उत्साह निर्माण करणारे आहे. देशभरात हे पवित्र पर्व जितक्या मोठ्या प्रमाणात साजरे केले जात आहे तो याचा प्रत्यक्ष दाखला आहे. देवभूमीचा हा वारसा आणखी जास्त समृद्ध होईल, असा मला विश्वास आहे.”
***
SonalT/ShaileshP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2072653)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam