माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इफ्फी 2024 मधल्या सहभागासाठी नोंदणी करण्याची प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शेवटची संधी
प्रसारमाध्यमांच्या नोंदणीसाठी आता उरले केवळ काही तास
सिनेमाचा आनंद घेण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचे इफ्फी स्वागत करत आहे
#IFFIWood, 12th November 2024
55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (इफ्फी) प्रसारमाध्यम प्रतिनिधी म्हणून नोंदणी प्रक्रिया, आज 12 नोव्हेबंर 2024 रोजी रात्री 11:59:59 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) बंद होणार असल्याने, 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत गोव्याला जाण्याची आणि या महोत्सवातील चित्रपटांचा आनंद घेण्याची इच्छा असलेल्या प्रसारमाध्यम समुदायातील चित्रपट रसिकांसाठी, प्रसारमाध्यम प्रतिनिधी म्हणून नोंदणी करण्यासाठी आता अखेरची संधी आहे. या नोंदणीसाठी त्यांना शेवटचे आवाहन करण्यात येत आहे.
तुम्ही अनुभवी चित्रपट समीक्षक असाल किंवा कथाकथनाविषयी प्रेम असलेले उदयोन्मुख पत्रकार असाल, गोव्यात पणजी येथे होत असलेल्या 55 व्या इफ्फीमध्ये सर्वोत्तम चित्रपट प्रतिभांचा अनुभव घेण्याची तुम्हाला ही शेवटची संधी आहे. या महोत्सवासाठी प्रसारमाध्यम प्रतिनिधी म्हणून नोंदणी करा आणि जगाच्या कानाकोपऱ्यात या महोत्सवाचा आनंद पोहोचवणाऱ्या चमूचा एक भाग बना.
नोंदणी प्रकिया
प्रसारमाध्यम प्रतिनिधी म्हणून नोंदणी करण्यासाठी 1 जानेवारी 2024 रोजी तुमचे वय 21 वर्षे पूर्ण असले पाहिजे आणि तुम्ही एखाद्या मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल किंवा ऑनलाईन माध्यम संघटना यांचे एक प्रतिनिधी, छायाचित्रकार, कॅमेरा पर्सन किंवा डिजिटल आशय निर्माते असणे आवश्यक आहे. वयाची अट पूर्ण करणाऱ्या मुक्त पत्रकारांना देखील नोंदणी करता येऊ शकेल. नोंदणी करण्यापूर्वी कृपया संबंधित पात्रता निकषांचे काळजीपूर्वक वाचन करा आणि नोंदणीपूर्वी नमूद केलेली कागदपत्रे अपलोड करण्यासाठी तयार ठेवा. नोंदणी प्रक्रिया अतिशय साधी आणि सहज आहे आणि ती https://my.iffigoa.org/media-login येथे पूर्ण करता येईल.
तुमच्या अर्जाची छाननी केल्यानंतर, प्रसारमाध्यम प्रतिनिधी म्हणून तुमच्या अधिस्वीकृतीला मिळालेली मान्यता, तुमच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर कळवण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. या नोंदणी प्रक्रियेतून पत्र सूचना कार्यालयाने(पीआयबी) अधिस्वीकृत केलेले प्रसारमाध्यम प्रतिनिधीच 55व्या इफ्फी 2024 च्या प्रसारमाध्यम प्रतिनिधी पासेसकरिता पात्र असतील. माध्यमांच्या प्रसारणांचा कालावधी आणि संख्या, आकारमान (वितरण, प्रेक्षकवर्ग, व्याप्तीनुसार), चित्रपटांवरील भर आणि इफ्फीचे अपेक्षित माध्यम वार्तांकन यांच्या आधारावर, देण्यात येणाऱ्या अधिस्वीकृतींची संख्या पीआयबी निश्चित करेल.
माध्यम प्रतिनिधींच्या प्रवेशिका 18 नोव्हेंबर 2024 पासून इफ्फीच्या महोत्सवस्थळामधून मिळतील. इतर माहिती व प्रश्नांसाठी iffi4pib[at]gmail[dot]com या इमेल पत्त्यावर मेल करावी व विषय Media Accreditation Query असा लिहावा.
चला तर मग, इफ्फीचा कॉउंटडाऊन सुरु होत आहे, आणि आपली उपस्थिती निश्चित होण्यासाठी त्वरित नोंदणी करा! आम्ही तुम्हा सर्वांची या चित्रपर्वणीत वाट पाहत आहोत.
इफ्फी बद्दल थोडी माहिती :
आशियातील मानाचा चित्रपटमहोत्सव म्हणून ‘भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’ची अर्थात IFFI ची सुरुवात 1952 साली झाली. सुरुवातीपासूनच या महोत्सवात चित्रपटांसोबतच त्यांच्या निर्मितीमागील अनेकांचे प्रयत्न व प्रतिभावंत कलाकारांच्या कहाण्या देखील सादर होत आल्या आहेत. चित्रपटनिर्मितीत सहभागी कलावंतांमधील बंधुभाव वाढावा, त्यांच्या कर्तृत्वात व कार्यक्षमतेत वाढ व्हावी तसेच चित्रपटांबद्दल रसिकांचे प्रेम वाढावे हेच या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय व गोवा राज्य सरकारच्या गोवा मनोरंजन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव दरवर्षी साजरा केला जातो. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपटमहोत्सव संचालनालयातर्फे (DFF) यापूर्वीपर्यंत या महोत्सवाचे आयोजन होत होते, परंतु राष्ट्रीय चित्रपट विकास मंडळामध्ये (NFDC) चित्रपट माध्यम विभाग विलीन झाल्यानंतर NFDC नेच या महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारली आहे. या 55व्या इफ्फी बद्दल अधिक माहितीसाठी iffigoa.org या महोत्सवाच्या संकेतस्थळाला कृपया भेट द्यावी व PIB च्या एक्स, फेसबुक, इंस्टाग्राम व व्हाट्सएप सारख्या समाजमाध्यम व्यासपीठांना फॉलो करावे.
***
ShaileshP/UmaR/DineshY
(Release ID: 2072635)
Visitor Counter : 61