पंतप्रधान कार्यालय
थिरू दिल्ली गणेश यांच्या निधनाबाबत पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
10 NOV 2024 5:49PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नामवंत चित्रपट अभिनेते थिरू दिल्ली गणेश यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला. मोदी यांनी म्हटले की थिरू गणेश हे उत्कृष्ट अभिनय कौशल्यांनी संपन्न होते. त्यांनी प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम केले आणि प्रेक्षकांच्या हृदयात जागा निर्माण केली होती. त्यांच्या प्रत्येक भूमिकेद्वारे ते विविध पिढ्यांतील प्रेक्षकांपर्यंत पोहोचत होते.
एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये पंतप्रधानांनी सांगितले:
“प्रतिष्ठित चित्रपट व्यक्तिमत्व थिरू दिल्ली गणेश यांच्या निधनाने व्यथित झालो आहे. त्यांना उत्तम अभिनय कौशल्य लाभले होते. त्यांनी रंगवलेली प्रत्येक भूमिका आणि प्रेक्षकांशी संवाद साधण्याची हातोटी यामुळे ते कायम सर्वांच्या स्मरणात राहतील. रंगभूमीवरही त्यांचे विशेष प्रेम होते. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती.”
***
S.Kane/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2072196)
अभ्यागत कक्ष : 69
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam