सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
'सकल देशांतर्गत उत्पादना'च्या अंदाजात्मक प्रसिद्धी पत्रकाच्या वेळेत बदल
Posted On:
08 NOV 2024 10:50AM by PIB Mumbai
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एन.एस.ओ), सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय (एम.ओ.एस.पी.आय.) द्वारे अंदाजात्मक प्रकाशन वेळापत्रकानुसार सकल देशांतर्गत उत्पादन (जी.डी.पी) याचे वार्षिक आणि त्रैमासिक अंदाज जारी केले जातात.(https://www.mospi.gov.in/sites/default/files//main_menu/Advance_Release_Calendar_16082024.pdf) . साधारणतः,जीडीपी ची आकडेवारी ही प्रसिद्धी पत्रकांद्वारे निर्धारित तारखांना संध्याकाळी 5:30 वाजता प्रकाशित केली जाते. तथापि, वापरकर्ते, माध्यम संस्था आणि जनतेसाठी जी.डी.पी ची आकडेवारी प्रकाशनाच्या दिवशी अधिक वेळ उपलब्ध व्हावी यासाठी, 'एमओएसपीआय'ने जी.डी.पी अंदाजाचे प्रसिद्धी पत्रक संध्याकाळी 5:30 ऐवजी 4:00 वाजता प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही नवीन वेळ भारतातील प्रमुख वित्तीय बाजाराच्या बंद होण्याच्या वेळेला अनुसरून ठरवण्यात आली आहे. ज्यामुळे हे सुनिश्चित होते की, जी.डी.पी आकडेवारीच्या अंदाज पत्रकाचा प्रसार सक्रीय बाजार व्यवहारांमध्ये हस्तक्षेप करणार नाही. ही सुधारणा 'एम.ओ.एस.पी.आय.'च्या पारदर्शकता आणि आकडेवारीच्या सुलभतेच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहे.
वित्तीय वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी (जुलै-सप्टेंबर) जी.डी.पी अंदाजाचे पुढील प्रसिद्धी पत्रक 29 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी 4:00 वाजता पत्र सूचना कार्यालय आणि मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल (https://www.mospi.gov.in) .
***
S.Tupe/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2071713)
Visitor Counter : 49