नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आंतरराष्ट्रीय सौरऊर्जा आघाडीने 2024-2026 साठी नवीन पदाधिकाऱ्यांची केली घोषणा


भारत आणि फ्रान्सने आयएसए संमेलनाचे अध्यक्ष आणि सहअध्यक्षपद कायम राखले

Posted On: 04 NOV 2024 8:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर 2024

नवी दिल्ली इथल्या भारत मंडपम इथे सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय सौरऊर्जा आघाडी संमेलनाच्या सातव्या सत्रात 2024 ते 2026 या दोन वर्षांच्या कालावधीसाठी अध्यक्ष व सहअध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यात  भारत हा अध्यक्षपदाचा एकमेव दावेदार होता तर सह -अध्यक्षपदाच्या निवडणुकीत फ्रांस आणि ग्रेनाडा यांच्यात लढत होती, ज्यात फ्रांस विजयी ठरला. आंतरराष्ट्रीय सौरऊर्जा आघाडीच्या संमेलनाच्या नियमांनुसार अध्यक्ष, सह अध्यक्ष व उपाध्यक्ष या पदांसाठी निवडणूक घेतली जाते. समान भौगोलिक प्रतिनिधित्वाच्या तत्वानुसार संमेलनात अध्यक्ष, सह अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांसाठी निवडणूक होते. आंतरराष्ट्रीय सौरऊर्जा आघाडी सदस्याचे चार क्षेत्रीय गट आहेत - आफ्रिका; आशिया व प्रशांत; युरोप व इतर ; लॅटिन अमेरिका व कॅरिबियन . या  प्रत्येक भौगोलिक गटामागे दोन या हिशोबाने स्थायी समितीचे आठ उपाध्यक्ष निवडले जातात. त्यांची नियुक्ती त्या विशिष्ट क्षेत्रात रॅटिफिकेशन चे अर्ज रोटेशन प्रमाणे डिपॉझिटरीला सादर करण्याच्या वरीयतेनुसार ठरवली जाते.

या निवडणूक प्रक्रियेनंतर घाना आणि सेशेल्स आफ्रिका क्षेत्रासाठीचे उपाध्यक्ष म्हणून पदभार सांभाळतील.आशिया आणि प्रशांत क्षेत्रासाठी ऑस्ट्रेलिया आणि  श्रीलंका उपाध्यक्ष असतील; युरोप आणि इतर क्षेत्रासाठी जर्मनी आणि  इटली उपाध्यक्ष असतील; लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन प्रदेशातून ग्रेनेडा आणि सुरीनाम हे देश उपाध्यक्ष असतील.  

आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था म्हणून, संमेलनाकडे  महत्त्वपूर्ण अधिकार आणि जबाबदारी आहे. हे संमेलन  प्रत्येक सदस्य देशाचे प्रतिनिधित्व करते आणि आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा आघाडीच्या आराखडा चौकटीच्या  अंमलबजावणीबाबत तसेच त्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी करावयाच्या समन्वित कृतींबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेते.

बैठकांची  नियमितता आणि महत्त्व अधोरेखित करून हे संमेलन  मंत्री स्तरावरील बैठक दरवर्षी आयोजित केली जाते. संमेलनात सौर ऊर्जा, कार्यप्रदर्शन, विश्वासार्हता, खर्च आणि वित्त पुरवठ्याच्या दृष्टीने कार्यक्रम आणि इतर उपक्रमांच्या  एकूण परिणामाचे मूल्यांकन करते.

आंतरराष्ट्रीय सौर आघाडीबद्दल अधिक माहिती:

आंतरराष्ट्रीय सौर आघाडी ही 120 सदस्य आणि स्वाक्षरीकर्ता देशांची  आंतरराष्ट्रीय संस्था आहे.ही आघाडी जगभरात ऊर्जा उपलब्धता आणि सुरक्षितता सुधारण्यासाठी आणि कार्बन डाय ऑक्साईड ऐवजी सौर उर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारांसोबत कार्य करते.आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे ध्येय 2030 पर्यंत सौर क्षेत्रात 1 कोटी अमेरिकन डॉलर गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य करत असताना तंत्रज्ञानाचा खर्च कमी करणे आणि त्याचा वित्तपुरवठा सक्षम करणे हे आहे. ही आघाडी कृषी, आरोग्य, वाहतूक आणि वीज निर्मिती क्षेत्रात सौरऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देते.

S.Kane/U.Raikar/S.Mukhedkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


 

 


(Release ID: 2070698) Visitor Counter : 57