पंचायती राज मंत्रालय
विशेष अभियान 4.0 अंतर्गत समोर ठेवलेली उद्दिष्टे पंचायती राज मंत्रायलाद्वारा यशस्वीपणे साध्य
लोकांनी दाखल केलेल्या तक्रारी आणि अपीलांचे 100% निराकरण करण्याचे उद्दिष्ट साध्य
प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी मंत्रालयाकडून प्रत्यक्ष तक्रारींच्या ठिकाणी जाऊन पडताळणी करण्याच्या धोरणाचा अवलंब
Posted On:
03 NOV 2024 10:33AM by PIB Mumbai
लोकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या उद्देशाने पंचायती राज मंत्रालयाच्या वतीने 2 ते 31 ऑक्टोबर 2024 या कालावधीत राबवल्या गेलेल्या विशेष अभियान 4.0 ची यशस्वी सांगता झाली. याअंतर्गत निकष म्हणून आखली गेलेली स्वच्छता मोहीमांचे आयोजन, दस्तऐवजांच्या नोंदीकरणाचे व्यवस्थापन या आणि अशा प्रकारची प्रमुख उद्दिष्टेही यशस्वीरित्या पूर्ण केली गेली. प्रलंबित प्रकरणे निकाली करण्यासाठीचे विशेष अभियान (Special Campaign for Disposal of Pending Matters (SCDPM) 4.0 च्या पोर्टल वरील लोकांनी नोंदवलेल्या तक्रारी तसेच लोकांच्या तक्रारींवरील अपीलांचे 100% निराकरण करण्याचे उद्दिष्टही या अभियानाअंतर्गत साध्य केले असल्याची माहिती पंचायती राज मंत्रालयाने दिली आहे.
या विशेष अभियान 4.0 च्या काळात, एकूण लोकांनी दाखल केलेल्या एकूण तक्रारी आणि, लोकांनी दाखल केलेल्या तक्रारींवरील 155 अपीले निकालात काढण्यात आली आहेत. त्यामुळे या अभियानाअंतर्गत समोर ठेवलेल्या सर्व उद्दिष्ट पूर्तता करण्यात मंत्रालयाला यश आले आहे. या अभियानाअंतर्गत (file) व्यवस्थापनाचे काम सुरळीत स्थितीत आणण्यासाठी पुनरावलोकनासाठी दस्तऐवजांच्या 1525 ई - संचिका (e-files) निवडल्या गेल्या होत्या. यांपैकी दस्तऐवजांच्या 650 ई - संचिकांचा सखोल आढावा घेतला गेला, तर दस्तऐवजांच्या 124 ई - संचिका बंद करण्यात आल्या. याअंतर्गत दस्तऐवजांच्या ई - संचिका हातळण्याची प्रणाली आणि त्याअंतर्गतची प्रक्रिया पूर्ण कार्यक्षमतेने सुरू होती.
या विशेष अभियान 4.0 दरम्यान पंचायती राज मंत्रालयाने तक्रार निवारणासाठी अनेक सक्रिय पावले उचलली. त्याअंतर्गत लोकांच्या तक्रारींच्या प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पडताळणी करण्यासाठी अधिकाऱ्यांची पथके स्थापन केली गेली. या पथकांच्या माध्यमातून राज्ये / केंद्रशासित प्रदेशांसोबत पाठपुरावा / सहभागाची प्रक्रिया विस्तारला गेला. या अभियानाअंतर्गत पंचयती राज मंत्रालयाने बाळगलेला हा दृष्टिकोन अत्यंत प्रभावी ठरला. त्यामुळेच असंख्य तक्रारदार याचिकाकर्त्यांनी त्यांच्या समस्यांचे सौहार्दपूर्ण आणि योग्य निराकरण झाल्याबद्दल समाधानही व्यक्त केले.
या संपूर्ण काळात पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज हे विशेष अभियान 4.0 च्या प्रगतीवर सातत्याने लक्ष ठेवून होते. यादृष्टीनेच त्यांनी 15 ऑक्टोबर 2024 रोजी मोहिमेच्या प्रगतीचा आढावाही घेतला. या अभियानांतर्गचा उपक्रम म्हणून अभियाच्या काळात हैदराबाद इथे जगण्यातील सुलभता : तळागाळापर्यंतच्या सेवा वितरणाचा विस्तार करणे या विषयावर पंचायत परिषदेचेही आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमुळे नागरिककेंद्रित प्रशासनासाठी मंत्रालयाची बांधिलकी अधिक दृढ झाली. विशेष अभियान 4.0 च्या काळातच स्वच्छता पंधरवाडा (16 ते 31 ऑक्टोबर 2024) आणि राष्ट्रीय शिक्षण सप्ताह (कर्मयोगी सप्ताह) (19 ते 25 ऑक्टोबर 2024, त्यानंतर या सप्ताहाला 27 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदतवाढ दिली गेली होती) या दोन महत्वाच्या उपक्रमांच्या आयोजनाचाही समावेश होता. समांतरपणे आयोजल्या गेलेल्या या उपक्रमांमुळे कौशल्यांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक वैयक्तिक आणि संघटनात्मक पातळीवरच्या प्रयत्नांनाही मोठी गती मिळाली. या मोहिमेदरम्यान, कृषी भवन, जीवन भारती इमारत आणि नवी दिल्लीतील जीवन प्रकाश इमारत या मंत्रालयाच्या तीन कार्यालयांच्या आवारात व्यापक स्वच्छता मोहीमा देखील राबवण्यात आल्या. या मोहीमांमुळे कामाच्या ठिकाणी उत्पादनक्षम आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करणे शक्य झाले.
प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने तसेच नागरिक सेवा वितरणावर भर देता यावा, याकरता वर्षभर या विशेष मोहिमेची गती कायम ठेवता यावी यासाठी मंत्रालयाने आपली वचनबद्धता पुनर्स्थापित केली आहे.
***
M.Chopade/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2070424)
Visitor Counter : 56