पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
कोलंबिया इथे सुरू असलेल्या कॉप 16 परिषदेत राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी जागतिक जैवविविधता संवर्धनासाठी भारताची वचनबद्धता केली अधोरेखित
Posted On:
30 OCT 2024 5:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2024
केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल राज्यमंत्री, कीर्तिवर्धन सिंह यांनी 29 ऑक्टोबर 2024 रोजी कोलंबियातील कॅली येथे सुरू असलेल्या, जैविक विविधतेच्या संदर्भातील पक्षांच्या परिषदेच्या (CoP) 16 व्या बैठकीच्या उच्चस्तरीय विभागात, जैविक संसाधनांच्या संवर्धनाबाबत राष्ट्रीय निवेदन दिले.
राज्यमंत्री सिंह यांनी कोलंबियाच्या पर्यावरण मंत्री सुसाना मुहम्मद यांचे कॉप 16 च्या नव्या अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केले. सुसाना मुहम्मद यांनी या परिषदेचे सर्वात जास्त काळ अध्यक्षपद भूषवणारे चीनचे हुआंग रुनक्यु यांच्यानंतर अध्यक्षस्थान स्वीकारले आहे.
भारताला भू मातेची पूजा करण्याची तसेच निसर्गाशी सुसंगत राहण्याची समृद्ध संस्कृती आणि परंपरा आहे, असे सिंह याप्रसंगी बोलताना म्हणाले. जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त 36 महत्त्वपूर्ण जैवविविधता स्थानांपैकी चार असणाऱ्या जगातील 17 भव्य-वैविध्यपूर्ण समृद्ध राष्ट्रांपैकी भारत एक आहे, असेही त्यांनी सांगितले.
सिंह यांनी वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांसाठी स्वतःचे तसेच जागतिक जैवविविधतेचे 'वसुधैव कुटुंबकम्- एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' या संकल्पनेनुसार संरक्षण करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेची पुनरावृत्ती करून आपल्या भाषणाचा समारोप केला.
* * *
S.Kakade/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2069606)