गृह मंत्रालय
'डिजिटल अटके' ची धमकी देऊन लोकांची फसवणूक करण्याच्या धोक्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी मन की बात च्या आजच्या भागात, समाजाला जागरूक केले
Posted On:
27 OCT 2024 5:56PM by PIB Mumbai
'डिजिटल अटके' ची धमकी देऊन लोकांची फसवणूक करण्याच्या धोक्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'च्या आजच्या भागात, समाजाला जागरूक केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे, “या फसवणूक करणाऱ्यांची मोडस ऑपरेंडी म्हणजे पोलिस, सीबीआय, अंमली पदार्थ विरोधी किंवा आरबीआय अधिकारी असल्याची बतावणी करणे आणि संशयास्पद कृत्य असल्याचे भासवत नागरिकांना व्हिडिओ कॉलद्वारे धमकावणे. कोणतीही सरकारी एजन्सी फोन किंवा व्हिडिओ कॉलद्वारे तपास करत नाही, याची आठवण करून देत मोदीजींनी अशा फसवणुकी रोखण्यासाठी नागरिकांनी करावयाच्या उपाययोजना सांगितल्या. अशा दुष्कृत्यांना आळा घालण्यासाठी मोदीजींनी 'रुको, सोचो और ॲक्शन लो' ही उक्ती अंमलात आणून हेल्पलाइन क्रमांक 1930 किंवा https://cybercrime.gov.in द्वारे ताबडतोब अधिकाऱ्यांना कळवण्याचे आवाहन केले आहे. मोदी सरकार सायबर सुरक्षित भारत निर्माण करण्यासाठी कटीबद्ध आहे.”
***
M.Pange/S.Naik/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2068726)
Visitor Counter : 64