नौवहन मंत्रालय
"दाना "चक्रीवादळामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने केले सावधगिरीच्या उपायांचे नियोजन
Posted On:
24 OCT 2024 10:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2024
"दाना" या तीव्र चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने बंदर, जहाजे आणि कर्मचाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी व्यापक सुरक्षा उपायांचे नियोजन केले आहे. बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली, आज बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय, नौवहन महासंचालनालय आणि भारतीय हवामान विभाग यांच्या सज्जतेचा विस्तृत आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.
हे चक्रीवादळ सध्या पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर केंद्रीत असून, ते 24 ऑक्टोबरच्या रात्री अधिक तीव्र होऊन, ओदिशा आणि पश्चिम बंगाल दरम्यानच्या भूप्रदेशात धडकण्याची शक्यता आहे. यावेळी ताशी 100-110 किमी वेगाचे वारे वाहतील. वाऱ्याचा वेग ताशी 120 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
बैठकीदरम्यान, राज्यमंत्र्यांनी कोलकाता बंदर आणि श्यामा प्रसाद मुखर्जी बंदराचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना, या प्रदेशात दाना चक्रीवादळाचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता असूनही, पूर्ण तयारी ठेवण्याची सूचना केली, जेणेकरून कोणतीही अनपेक्षित घटना हाताळण्यासाठी सज्ज राहता येईल, आणि जीवित अथवा मालमत्तेची हानी टाळता येईल.
पारादीप बंदरातील सर्व ड्रेजर, बार्ज आणि सपोर्ट क्राफ्ट प्रतिकूल हवामानापासून सुरक्षित ठेवण्याचे निर्देश मंत्रालयाने दिले आहेत.
बंदर व्यवस्थापन बांधकामाधीन भागातील आवश्यक उपकरणांची सुरक्षा सुनिश्चित करत आहे, तसेच हाय मास्ट लाइट्स, लोडिंग आर्म्स आणि गँगवेच्या सुरक्षेची व्यवस्था करत आहे.
राज्य आणि स्थानिक प्राधिकरणांच्या समन्वयाने, मंत्रालयाने नागरिकांना निवारा छावण्यांमध्ये नेण्यासाठी बसेसची व्यवस्था केली असून, स्थलांतराच्या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी सज्ज आहे. चक्रीवादळामुळे बाधित नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी औषधांचा पुरेसा साठा, पिण्याचे पाणी आणि शिजवलेले अन्न निवारागृहांमध्ये वितरित केले जात आहे.
S.Kane/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2067961)
Visitor Counter : 57