युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

क्रीडा पुरस्कार - 2024 साठी मागवण्यात येत आहेत अर्ज

Posted On: 24 OCT 2024 7:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2024

क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी आणि खेळाडूंना पुरस्कृत करण्यासाठी दरवर्षी क्रीडा पुरस्कार दिले जातात.

क्रीडा पुरस्कारांच्या विविध योजनांचे तर्कसंगतीकरण करण्यात आले असून त्यामध्ये ध्यानचंद पुरस्काराच्या जागी अर्जुन पुरस्कार (जीवनगौरव) सुरू करण्यात आला आहे.तळागाळातील किंवा विकासाच्या टप्प्यावरील प्रशिक्षकांच्या प्रयत्नांचा गौरव करण्यासाठी ते आता द्रोणाचार्य पुरस्कारासाठी पात्र आहेत.याशिवाय,खेलो इंडिया योजनेला मान्यता देण्यासाठी,खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत एकूणच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला मौलाना अब्दुल कलाम आझाद चषक दिला जाईल.नवीन योजनांची माहिती मंत्रालयाच्या www.yas.nic.in या संकेतस्थळावर पाहता येईल.

भारत सरकारचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय दरवर्षी क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज आमंत्रित करते.2024 च्या या क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज मागवणाऱ्या अधिसूचना www.yas.nic.in या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आल्या आहेत.

संबंधित पुरस्कारांसाठी पात्र खेळाडू आणि प्रशिक्षक तसेच संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.एका समर्पित पोर्टलद्वारे केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. पुरस्कार मार्गदर्शक तत्त्वांनुसार पात्र असलेल्या अर्जदारांनी केवळ dbtyas-sports.gov.in या पोर्टलवर ऑनलाइन स्वयं-अर्ज करणे आवश्यक आहे.ऑनलाइन अर्ज करताना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागल्यास,अर्जदार क्रीडा विभागाशी पुढील ई-मेल आयडी द्वारे sportsawards-moyas[at]gov[dot]in किंवा 011-23387432 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा कोणत्याही कामाच्या दिवशी सकाळी 9.00 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत संपर्क साधू शकतो.अर्जदाराला कुठलीही समस्या उद्भवल्यास  टोल फ्री क्रमांक 1800-202-5155, 1800-258-5155 (कोणत्याही कामाच्या दिवशी) यावरही संपर्क साधू शकतो. पुरस्कारांसाठी पात्र खेळाडू आणि प्रशिक्षक तसेच संस्था यांचे अर्ज dbtyas-sports.gov.in या ऑनलाइन पोर्टलवर 14 नोव्हेंबर 2024 (गुरुवार) रात्री 11.29 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 




(Release ID: 2067896) Visitor Counter : 27