नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पर्यावरण जहाज निर्देशांक (ESI) मंचावर प्रोत्साहन प्रदाता म्हणून मुरगाव बंदर प्राधिकरणाला जागतिक स्तरावर मिळाली मान्यता

Posted On: 24 OCT 2024 4:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2024

पर्यावरण जहाज निर्देशांक (ईएसआय ) पोर्टलवर, प्रोत्साहन प्रदाता म्हणून सूचीबद्ध होत मुरगाव बंदर प्राधिकरणाने इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ पोर्ट्स अँड हार्बर्सची जागतिक मान्यता मिळवली आहे. हे यश जहाजांसाठी पर्यावरणास अनुकूल पद्धतींना प्रोत्साहन देण्याप्रति बंदराची वचनबद्धता  अधोरेखित करते.

ईएसआय द्वारे ग्रीन शिप इन्सेंटिव्ह मिळालेले,मुरगाव बंदर हे भारतातील पहिले बंदर  आहे, जे नौवहनातील  हवेचे उत्सर्जन कमी करण्याच्या जागतिक प्रयत्नांना  अनुकूल ठरले आहे. ‘हरित श्रेय,’ हा या बंदरावरील प्रोत्साहन कार्यक्रम ऑक्टोबर 2023 मध्ये सुरू करण्यात आला, ज्यात ईएसआय गुणांच्या  आधारे   उच्च पर्यावरणीय कामगिरी करणाऱ्या  जहाजांना बंदर शुल्कात सवलत मिळते .

ऑगस्ट 2024 मध्ये,इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ पोर्ट्स अँड हार्बर्सच्या सरचिटणीसांनी ईएसआय कार्यक्रमात सामील होण्याच्या तसेच या प्रदेशात ग्रीन शिपिंग प्रोत्साहनांबद्दल जागरूकता वाढवण्याच्या मुरगाव बंदराच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.जपान आणि ओमानच्या यांच्यासारखेच  हरीत प्रोत्साहन देणारे मुरगाव बंदर हे आशियामधील वैशिष्ट्यपूर्ण बंदर ठरले आहे

हरित श्रेय योजना सुरू झाल्यापासून, हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने अनेक जहाजांना या प्रोत्साहनाचा लाभ मिळाला  आहे.हा उपक्रम सागरी अभियानात  दीर्घकाळ कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या व्यापक उद्दिष्टाला समर्थन देतो. बंदर प्राधिकरणाने जागतिक पोर्ट शाश्वतता कार्यक्रम  (WPSP) अंतर्गत IAPH सस्टेनेबिलिटी अवॉर्ड्ससाठी योजना देखील सादर केली असून  शाश्वत पद्धतींप्रति  समर्पणावर भर दिला आहे.

या मान्यतेमुळे मुरगाव बंदरला शाश्वत सागरी पद्धतींना चालना देणारे, कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना हातभार लावणारे साठी एक प्रमुख बंदर  म्हणून स्थान मिळाले आहे.

S.Kane/S.Patgaonkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 2067714) Visitor Counter : 74