राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
उपराष्ट्रपती जगदीप धनखड राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या 31 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार
Posted On:
16 OCT 2024 3:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2024
‘राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC), इंडिया (भारत)’ ने 18 ऑक्टोबर 2024 रोजी विज्ञान भवन येथे आपल्या 31 व्या स्थापना दिनानिमित्त एक कार्यक्रम आयोजित केला आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून ते यावेळी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांना संबोधित करतील. एनएचआरसी इंडिया च्या काळजीवाहू अध्यक्ष विजया भारती सयानी, आणि सरचिटणीस भरत लाल यांच्यासह आयोगाचे इतर वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
त्यानंतर, आयोगाने ‘वृद्ध व्यक्तींचे (ज्येष्ठ नागरिक) हक्क’, या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. ‘भारतीय वृद्ध व्यक्तींसाठी स्ट्रक्चरल फ्रेमवर्क (संरचनात्मक चौकट), कायदेशीर सुरक्षा, सुरक्षेचा अधिकार आणि संस्थात्मक संरक्षण, याचे मूल्यांकन’,ही या परिषदेची संकल्पना आहे. या परिषदेत ‘वृद्ध जनतेच्या समस्यांचे निराकरण’, ‘वृद्धत्वाबाबत लिंगाधारित दृष्टीकोन’, आणि ‘आरोग्य सेवा परीप्रेक्षाचे मूल्यमापन- निरोगी जीवन, उत्पादकता आणि सामाजिक सुरक्षेवरील प्रभाव’, या तीन महत्वाच्या मुद्द्यांवरील तांत्रिक सत्रांमधून वृद्ध व्यक्तींच्या विविध समस्यांवर चर्चा होईल. या सत्राला प्रख्यात तज्ञ आणि समाजाच्या प्रतिनिधींसह विविध भागधारक उपस्थित राहतील आणि आपले विचार मांडतील.
स्थापना दिवस आणि राष्ट्रीय परिषदेचे थेट YouTube आणि वेबकास्ट येथे पाहता येईल:
https://www.youtube.com/watch?v=vzxbGV2pGGU
आणि
https://webcast.gov.in/nhrc
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2065359)
Visitor Counter : 82