गृह मंत्रालय
अंमली पदार्थांच्या धोक्यापासून युवा वर्गाचे संरक्षण करत नशामुक्त भारताच्या निर्मितीसाठी नरेंद्र मोदी सरकार कटिबद्ध असल्याचे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन
अंमली पदार्थ आणि नार्को व्यापाराविरोधातील मोहीम जराही ढिलाई न करता जारी राहणार
Posted On:
14 OCT 2024 8:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आपल्या युवा वर्गाला अंमली पदार्थांच्या धोक्यापासून वाचवून नशामुक्त भारत निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.
एक्स या समाजमाध्यमावरील एका पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले की, अंमली पदार्थ आणि नार्को व्यापाराविरोधातील मोहीम जराही ढिलाई न करता जारी राहील.
गुजरात पोलिसांच्या सहकार्याने 5,000 कोटी रुपयांच्या कोकेनच्या जप्तीसह विविध कारवाईत 13,000 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केल्याबद्दल शाह यांनी दिल्ली पोलिसांचे अभिनंदन केले.
अंमली पदार्थांच्या व्यापारावरील अलीकडील कारवाईचा एक भाग म्हणून, दिल्ली पोलिस आणि गुजरात पोलिसांच्या विशेष पथकाने 13 ऑक्टोबर 2024 रोजी गुजरातमधील अंकलेश्वर येथील एका कंपनीवर छापा टाकला आणि 518 किलो कोकेन जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे 5,000 कोटी रुपये आहे.
यापूर्वी, 01 ऑक्टोबर 2024 रोजी, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने महिपालपूरमधील एका गोदामावर छापा टाकला होता आणि 562 किलो कोकेन आणि 40 किलो हायड्रोपोनिक गांजा असलेला माल जप्त केला होता.तपासादरम्यान, 10 ऑक्टोबर 2024 रोजी, दिल्लीतील रमेश नगर मधील एका दुकानातून अंदाजे 208 किलो अतिरिक्त कोकेन जप्त करण्यात आले. चौकशीत हे अंमली पदार्थ गुजरातमधील अंकलेश्वर येथील कंपनीतून आल्याचे उघड झाले.
या प्रकरणात,आतापर्यंत एकूण 1,289 किलो कोकेन आणि 40 किलो हायड्रोपोनिक थायलंड गांजा जप्त करण्यात आला आहे ज्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 13,000 कोटी रुपये आहे.
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2064847)