पंतप्रधान कार्यालय
‘पीएम गतिशक्ती’ राष्ट्रीय बृहद आराखड्याला 3 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली प्रशंसा
भारताच्या पायाभूत सुविधांमध्ये क्रांती घडवण्याच्या उद्देशाने सुरू झालेला ‘पीएम गतिशक्ती’ बृहद आराखडा, एक परिवर्तनकारी उपक्रम म्हणून उदयाला आला आहेः पंतप्रधान
विकसित भारताचे आपले स्वप्न पूर्ण करण्याला भारत गती देत आहे, याबद्दल ‘गतिशक्ती’ला श्रेय दिले पाहिजेः पंतप्रधान
Posted On:
13 OCT 2024 10:32AM by PIB Mumbai
‘पीएम गतिशक्ती’ राष्ट्रीय बृहद आराखड्याला 3 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांची एक पोस्ट आणि मायजीओव्हीची एक थ्रेड पोस्ट एक्स या समाजमाध्यमावर सामाईक करत पंतप्रधानांनी लिहिलेः
“भारताच्या पायाभूत सुविधांमध्ये क्रांती घडवण्याच्या उद्देशाने सुरू झालेला पीएम गतिशक्ती बृहद आराखडा, एक परिवर्तनकारी उपक्रम म्हणून उदयाला आला आहे. त्याने मल्टीमोडल संपर्कव्यवस्थेला लक्षणीय चालना दिली आहे, ज्यामुळे विविध क्षेत्रात गतिमान आणि अधिक कार्यक्षम विकास होऊ लागला आहे. विविध हितधारकांचे अखंडित एकात्मिकरण झाल्यामुळे लॉजिस्टिक्सला चालना मिळाली आहे, विलंब टळू लागला आहे आणि अनेक लोकांसाठी नव्या संधी निर्माण होत आहेत.”
“विकसित भारताचे आपले स्वप्न पूर्ण करण्याला भारत गती देत आहे, याबद्दल गतिशक्तीला श्रेय दिले पाहिजे. यामुळे प्रगती, उद्योजकता आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन मिळेल.”
***
S.Pophale/S.Patil/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2064489)
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada