पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाओ पीडीआरच्या पंतप्रधानांची भेट घेतली

Posted On: 11 OCT 2024 5:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 ऑक्‍टोबर 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिएन्टिनमध्ये लाओ पीडीआरचे पंतप्रधान सोनेक्साय सिपानदोन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. 21व्या आसियान-भारत आणि 19 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल त्यांनी लाओसच्या  पंतप्रधानांचे अभिनंदन केले.

दोन्ही पंतप्रधानांनी भारत-लाओस दरम्यानचे प्राचीन आणि समकालीन संबंध अधिक दृढ करण्याबाबत  फलदायी चर्चा केली. त्यांनी द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रांवर उदा. विकास भागीदारी, क्षमता निर्मिती, आपत्ती व्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जा, वारसा जतन करणे, आर्थिक संबंध, संरक्षण सहकार्य आणि लोकांमधील संबंध यावर चर्चा केली. यागी वादळानंतर पूरग्रस्त लाओ पीडीआरला भारताने पुरवलेल्या मदतीबद्दल पंतप्रधान सिपानदोन यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणद्वारे  भारताच्या  सहाय्याने  युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या वाट फोऊ इथे  सुरू असलेला जीर्णोद्धार आणि संवर्धन द्विपक्षीय संबंधांना एक विशेष आयाम  देते असे दोन्ही नेत्यांनी नमूद केले. 

दोन्ही पंतप्रधानांनी प्रादेशिक आणि बहुपक्षीय व्यासपीठांवर देशांमधील घनिष्ठ सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. पंतप्रधान सिपानदोन यांनी आंतरराष्ट्रीय मंचावर भारताच्या भूमिकेला दुजोरा दिला. भारताने 2024 साठी आसियानच्या अध्यक्षपदासाठी लाओ पीडिआर ला ठोस पाठिंबा दिला आहे.

चर्चेनंतर, दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत संरक्षण, प्रसारण, सीमाशुल्क सहकार्य आणि मेकाँग-गंगा सहकार्य अंतर्गत तीन त्वरित प्रभाव प्रकल्प (क्यूआयपी) क्षेत्रातील सामंजस्य करार/करारांची देवाणघेवाण झाली. हे क्यूआयपी  लाओ रामायणच्या वारशाचे जतन करणे, रामायणाशी संबंधित भित्तीचित्रांसह वाट फ्रा किउ बौद्ध मंदिराचा जीर्णोद्धार आणि चंपासाक प्रांतातील रामायणावरील शॅडो कठपुतळी थिएटरला पाठिंबा देण्याशी संबंधित आहेत. तिन्ही क्यूआयपी ना  प्रत्येकी  50000 अमेरिकी डॉलर्सचे भारत सरकारचे अनुदान मिळत आहे. लाओ पीडिआर मध्ये पोषण सुरक्षा सुधारण्यासाठी भारत सुमारे  1 दशलक्ष अनुदान सहाय्य देखील प्रदान करेल. भारत संयुक्त राष्ट्र विकास भागीदारी निधीच्या माध्यमातून  दिली जाणारी ही मदत, दक्षिण-पूर्व आशियातील अशा प्रकारचा निधीचा पहिला प्रकल्प असेल. सामंजस्य करार, करार आणि घोषणांचे तपशील येथे पाहता येतील.

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2064194) Visitor Counter : 29