अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर 7 ऑक्टोबर 2024 पर्यंत 34.84 लाखांपेक्षा जास्त ऑडिट रिपोर्ट दाखल करण्यात आले

Posted On: 09 OCT 2024 8:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 ऑक्‍टोबर 2024

 

आर्थिक वर्ष 2024-25 साठी प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर अंतिम तारखेपर्यंत 34.09 लाख टॅक्स ऑडिट रिपोर्टसह 34.84 लाखांपेक्षा जास्त ऑडिट रिपोर्ट दाखल करण्यात आले आहेत. आर्थिक वर्ष 2023-24 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याच्या प्रमाणात सुमारे 4.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

करदात्यांना मदत करण्यासाठी विभागाने  ईमेल्स, एसएमएस, वेबिनार्स, समाज माध्यम मोहिमा आणि प्राप्तिकर विभागाच्या पोर्टलवर मेसेज यांच्या माध्यमातून करदात्यांमध्ये टॅक्स ऑडिट रिपोर्ट आणि इतर ऑडिट फॉर्म विहित तारखेच्या आत दाखल करण्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात संपर्क कार्यक्रम राबवले आहेत. वापरकर्त्यांमध्ये जागरुकता निर्माण करणारे विविध व्हिडिओज सुद्धा प्राप्तिकर विभागाच्या पोर्टलवर अपलोड करून मार्गदर्शन करण्यात आले. अशा प्रकारच्या एकत्रित प्रयत्नांमुळे करदाते आणि कर व्यावसायिकांना फॉर्म क्रमांक 10B, 10BB, 3CA-CD, 3CB-CD आणि इतर ऑडिट रिपोर्ट फॉर्म क्रमांक  29B, 29C, 10CCB इ. मध्ये टीएआर दाखल करण्याचे अनुपालन वेळेत करण्यासाठी मदत झाली आहे.

ई-फायलिंग हेल्पडेस्कने सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2024 मध्ये 1.23 लाख शंकांची हाताळणी केली आणि या संपूर्ण फायलिंग काळात स्वतः पुढाकार घेऊन मदत केली. या टीमने करदाते आणि कर व्यावसायिकांना गुंतागुंत सोडवण्यासाठी आणि अतिशय सहजपणे ऑडिट फॉर्म दाखल करण्यासाठी मदत केली. हेल्पडेस्कने त्यांना येणाऱ्या आणि त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या कॉलच्या, लाईव्ह चॅट्स, वेबएक्स आणि को-ब्राउझिंग सेशन्सच्या माध्यमातून हे पाठबळ दिले. विभागाच्या एक्स हँडलवर(पूर्वाश्रमीचे ट्वीटर) प्राप्त होणाऱ्या शंकांचे देखील ऑनलाईऩ रिस्पॉन्स मॅनेजमेंटच्या माध्यमातून करदाते आणि हितधारक यांच्यापर्यंत पोहोचून आणि विविध मुद्यांवर त्याच क्षणी त्यांना मदत उपलब्ध करून निरसन केले.

 

* * *

N.Chitale/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2063662) Visitor Counter : 36