पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी मुंबई मेट्रो लाईन 3 च्या आरे जेव्हीएलआर ते बीकेसी मार्गिकेच्या उद्घाटनाबद्दल मुंबईकरांचे केले अभिनंदन
मुंबईतील मेट्रोचे जाळे विस्तारत आहे, लोकांच्या ‘जीवन सुलभतेला ’ चालना मिळत आहे: पंतप्रधान
पंतप्रधानांनी विद्यार्थी, युवक, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आणि मेट्रोची उभारणी करणाऱ्या श्रमिकांशी साधला संवाद
प्रविष्टि तिथि:
05 OCT 2024 9:03PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबई मेट्रो लाईन 3 च्या पहिल्या टप्प्या अंतर्गत आरे जेव्हीएलआर ते बीकेसी मार्गिकेचे उद्घाटन झाल्याबद्दल मुंबईकरांचे अभिनंदन केले. मुंबईच्या मेट्रो नेटवर्कच्या विस्तारामुळे लोकांच्या 'जीवन सुलभतेला ’ चालना मिळेल असे त्यांनी नमूद केले.
एक्स वर एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले:
“मुंबईतील मेट्रोचे जाळे विस्तारले, नागरिकांच्या जीवन सुलभतेला मिळणार चालना! मुंबई मेट्रो लाइन 3, च्या पहिल्या टप्प्या अंतर्गत आरे जेव्हीएलआर ते बीकेसी मार्गिकेचे उद्घाटन झाल्याबद्दल मुंबईकरांचे अभिनंदन.”
मोदी यांनी मेट्रोमधून प्रवास केला आणि विद्यार्थी, युवक , मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आणि मेट्रोची उभारणी करणाऱ्या श्रमिकांशी संवाद देखील साधला.
एक्स वर एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले:
“विद्यार्थी, युवक, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आणि मेट्रोची उभारणी करणाऱ्या श्रमिकांशी संवाद साधून आनंद झाला.”
***
S.Patil/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2062550)
आगंतुक पटल : 84
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam