गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी यावर्षी गांधी जयंतीनिमित्त नवी दिल्ली येथील कॅनॉट प्लेस येथे भरलेल्या 'खादी इंडिया' प्रदर्शनात विक्रमी 2.01 कोटी रुपयांच्या वस्तूंच्या विक्रीबद्दल सर्व खादी उत्पादकांचे केले अभिनंदन
Posted On:
05 OCT 2024 7:53PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आणि यावर्षीच्या गांधी जयंतीनिमित्त नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथे भरलेल्या 'खादी इंडिया' प्रदर्शनात विक्रमी 2.01 कोटी रुपयांच्या खादीच्या वस्तूंच्या विक्रीबद्दल आनंद व्यक्त केला तसेच सर्व खादी उत्पादकांचे अभिनंदनही केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले खादी आणि स्थानिक उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन आता क्रांती बनले आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली खादी उद्योग आज नवे विक्रम प्रस्थापित करत आहे, असे एक्स या समाज माध्यमावरील एका संदेशात अमित शाह म्हणाले. यावर्षी गांधी जयंतीनिमित्त नवी दिल्लीतील कनॉट प्लेस येथील 'खादी इंडिया' प्रदर्शनात विक्रमी 2.01 कोटी रुपयांच्या वस्तूंची विक्री ही खरोखरच आनंदाची बाब आहे, असे ते म्हणाले. यामुळे खादी कारागिरांच्या जीवनात सकारात्मक बदल होऊन त्यांना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. लोकांमध्ये स्वदेशी उत्पादनांविषयी वाढत जाणारे आकर्षण आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे गृहमंत्री म्हणाले.
***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2062536)