नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी शाश्वत विकास आणि नवीकरणीय उर्जेच्या क्षेत्रात भारताचे सहकार्य मजबूत करण्यासाठी जर्मनीच्या तीन दिवसीय दौऱ्यावर होणार रवाना
केंद्रीय मंत्री 7 ते 8 ऑक्टोबर 2024 दरम्यान हॅम्बर्ग शाश्वतता परिषदेत सहभागी होणार असून मंत्र्यांशी आणि आघाडीच्या उद्योजाकांसोबत भेट घेणार आहेत.
Posted On:
05 OCT 2024 1:59PM by PIB Mumbai
नवीकरणीय ऊर्जा आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात भारताचे आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हे 6 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू होणाऱ्या जर्मनीच्या तीन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी 7 ते 8 ऑक्टोबर 2024 दरम्यान हॅम्बर्ग शाश्वतता परिषदेत सहभागी होणार असून शाश्वत विकास, ग्रीन हायड्रोजन, कमी खर्चाचे वित्तपुरवठा आणि नवीकरणीय ऊर्जा मूल्य शृंखलेच्या घटकांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी जर्मनी, युनायटेड किंगडम आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी द्विपक्षीय बैठका घेणार आहेत.
या परिषदेत केंद्रीय मंत्री ग्रीन शिपिंग आणि गतिशीलता क्षेत्रातील डीकार्बोनायझेशनसाठी ग्रीन हायड्रोजनच्या भूमिकेवर भारताचे मत मांडतील. या भेटीमुळे भारत-जर्मनी संबंधांना चालना मिळून भारत आणि जगभरातील नवीकरणीय ऊर्जा विस्तारण्यास मदत होईल. यासोबतच जागतिक समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय भागीदारी मजबूत करून शाश्वत विकास आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात भारताची बांधिलकी ठळकपणे अधोरेखित होईल.
***
S.Patil/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2062469)
Visitor Counter : 43