संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

भारतीय संरक्षण उद्योगाला निर्यातभिमुख  तसेच जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यासाठी सरकार वचनबद्ध - एसआयडीएम च्या 7व्या वार्षिक सत्रात संरक्षणमंत्र्यांनी दिली ग्वाही


उद्दिष्ट-केंद्रित दृष्टिकोनासह आयात-निर्यात गुणोत्तर कमी करण्यासाठी उद्योग जगताने प्रयत्न करावेत  - संरक्षणमंत्री

Posted On: 04 OCT 2024 2:34PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशाला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याची संकल्पना साकार करण्यासाठी, संरक्षण उद्योगाला सशक्त करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पुनरुच्चार केला. 04 ऑक्टोबर, 2024 रोजी नवी दिल्ली येथे भारतीय संरक्षण उत्पादक सोसायटी (एसआयडीएम) च्या सातव्या वार्षिक सत्राला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संबोधित केले. याप्रसंगी बोलताना त्यांनी सध्या सुरू असलेले  रशिया-युक्रेन युद्धमजबूत संरक्षण औद्योगिक पाया विकसित करण्याची आणि वेळोवेळी हा पाया अधिक भक्कम आणि विस्तारित करण्याची गरज असल्याची  आठवण करून देत आहे असे त्यांनी सांगितले.

मोदी सरकार आपल्या सलग तिसऱ्या कार्यकाळात, एक मजबूत, नवोन्मेषी आणि स्वावलंबी संरक्षण परिसंस्था विकसित करण्याच्या दिशेने चालू असलेल्या प्रयत्नांना चालना देत राहील, असेही संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.  संरक्षण उत्पादनात ‘आत्मनिर्भरता’ प्राप्त करण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांचा त्यांनी  उल्लेख केला. 

5,500 हून अधिक वस्तू अधिसूचित करणाऱ्या 10 सकारात्मक स्वदेशीकरण याद्यांबाबत बोलताना संरक्षणमंत्र्यांनी सशस्त्र दलांना भारतीय भूमीवर उत्पादित युद्ध सामुग्री आणि उपकरणांनी सुसज्ज करण्याचा विचार असल्याचे  सांगितले. या सूची  गतिमान असून स्थिर नसल्याचा उल्लेख त्यांनी केला. संरक्षण उद्योगांनी या वस्तूंच्या उत्पादनात विहित वेळेत पूर्ण आत्मनिर्भरता  साध्य करण्याचे आणि आयात सामुग्रीची यादी लहान करत राहण्याचे आवाहन सिंह यांनी केले.  जगभरातील संरक्षण क्षेत्रात होत असलेल्या जलद बदलांच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक स्वदेशीकरण सूचीमध्ये जोडता येणाऱ्या उत्पादनांचे मूल्यमापन करून ती संरक्षण उत्पादने सुनिश्चित करण्याचे आवाहन त्यांनी केले.

सरकारच्या प्रयत्नांमुळे देशात व्यवसाय सुलभ करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे आणि त्यामुळे भारताचा संरक्षण उद्योग निर्यातभिमुख  करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.  2023-24 आर्थिक वर्षात संरक्षण निर्यात 21,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त विक्रमी उच्चांकावर नेण्यात खाजगी क्षेत्राच्या प्रमुख योगदानाचे सिंह यांनी कौतुक केले. यासोबतच, उद्योगांनी निर्यात आणि आयातीच्या आकड्यांवर लक्ष ठेवण्याचे आणि लक्ष्याभिमुख दृष्टिकोनाने आयात निर्यात गुणोत्तर कमी करण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन  त्यांनी केले.

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये वार्षिक संरक्षण उत्पादन 1.27 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्याबद्दल संरक्षणमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला.

संरक्षण क्षेत्रातील लघु आणि मध्यम उद्योग (SMEs) तसेच स्टार्ट-अप्सच्या क्षमता ओळखून, संरक्षणमंत्र्यांनी व्यवसाय सुलभ करण्यासाठी त्यांच्यासमोर येणाऱ्या आव्हानांचा उल्लेख केला.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण उद्योगांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सायबर संरक्षण आणि स्वायत्त प्रणाली यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये अधिकाधिक गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2062106) Visitor Counter : 15