सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांना मिळालेल्या  स्मृतीचिन्हांच्‍या  ई-लिलावासाठी  31 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत 

Posted On: 02 OCT 2024 2:07PM by PIB Mumbai

 

संस्कृती  मंत्रालयाच्या वतीने विशेष  ई-लिलावासाठी  मुदतवाढ दिली आहे. या लिलावासाठी  पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या स्मृतिचिन्हांचा अनोखा संग्रह प्रदर्शित केला आहे. हा लिलाव भारताचा समृद्ध सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा दर्शवणारा आहे.

याआधी  17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 या कालावधीत प्रस्तुत ई-लिलाव  नियोजित केला होता.  मात्र आता  लिलाव  31 ऑक्टोबर 2024 पर्यंत सहभागासाठी खुला असणार आहे.  इच्छुक व्यक्ती अधिकृत वेबसाइटद्वारे नोंदणी करू शकतात आणि लिलावात सामील होऊ शकतात. संकेतस्‍थळ -  https://pmmementos.gov.in/.

या लिलावामधील  वस्तूंमध्ये पारंपरिक कला प्रकारांचा समावेश आहे.  ज्यामध्ये आकर्षक  चित्रे, अ‍त्यंत अनोख्‍या शैलीतील  शिल्पे, स्वदेशी हस्तकला, आकर्षक लोककलांचे दर्शन देणा-या कलाक़ती  आणि आदिवासी कलाकृतींचा समावेश  आहे.  या खजिन्यांमध्ये पारंपरिक वस्त्र-प्रावरणे, शालशिरोभूषणे  आणि भेटीदाखल दिलेल्या  तलवारींसह पारंपरिक सन्मान आणि आदराचे प्रतीक म्हणून प्रदान केलेल्या वस्तू आहेत.

तसेच ई-लिलावामध्‍ये खादी शाल, चांदीचे नाजूक नक्षीकाम केलेल्या वस्‍तू, माता नी पचेडी कला , गोंड कला  आणि मधुबनी कला यांचे प्रदर्शन करणाऱ्या आकर्षक  वस्तूभारताच्या विविध सांस्कृतिक वारशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक वस्तू पंतप्रधानांना भेटीदाखल आल्या आहेत, त्याचा लिलाव केला जाणार आहे. पॅरा ऑलिम्पिक, 2024 मधील क्रीडा स्‍पर्धांमधील  संस्मरणीय वस्तू हे लिलावाचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. प्रत्येक क्रीडा स्‍पर्धेतील संस्मरणीय क्रीडापटूंकडे असलेली  असामान्य खिलाडूवृत्‍ती  आणि दृढनिश्चय साजरे करणाऱ्या या वस्‍तू असतात.  अशा वस्‍तू या  त्यांच्या कठोर परिश्रम आणि लवचिकतेचा पुरावा असतात. अशी  स्मृतीचिन्हे  त्यांच्या कर्तृत्वाचा केवळ सन्मानच करत नाही तर भावी पिढ्यांना प्रेरणाही देतात;

यंदा होत असलेला  ई-लिलाव हा यशस्वी लिलावांच्या मालिकेतील सहावी आवृत्ती आहे.  अशा प्रकारे पंतप्रधानांना मिळालेल्‍या सन्‍मानचिन्हांचा पहिला लिलाव  जानेवारी 2019 मध्ये केला गेला होता.  मागील आवृत्त्यांप्रमाणेच , लिलावाच्या या आवृत्तीतून मिळणारे उत्पन्न देखील नमामि गंगे प्रकल्पासाठी योगदान देईल. आपली राष्ट्रीय नदी, गंगा आणि तिच्या नाजूक परिसंस्थेच्या संरक्षणासाठी आणि पुनर्संचयनासाठी समर्पित केंद्र सरकारचा  प्रमुख उपक्रम आहे. या लिलावाद्वारे निर्माण होणारा निधी  गंगा स्‍वच्छतेच्या  योग्य कारणासाठी समर्थन प्रदान करेल, आपल्या  पर्यावरणाचे रक्षण करण्याची आपली  वचनबद्धता मजबूत करणार आहे.

***

S.Patil/S.Bedekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2061227) Visitor Counter : 47