पंतप्रधान कार्यालय
स्वच्छ भारत अभियानाची यशस्वी 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जागतिक संघटनांच्या नेत्यांकडून पंतप्रधानांना अभिनंदनपर संदेश
Posted On:
02 OCT 2024 2:03PM by PIB Mumbai
स्वच्छ भारत अभियानाला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विविध जागतिक संघटनांच्या नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज अभिनंदनपर संदेश प्राप्त झाले आहेत. पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली स्वच्छ भारत अभियानाने स्वच्छतेच्या बाबतीत सुधारणा घडवून भारताचा कायापालट केला आहे यावर या नेत्यांनी भर दिला.
पंतप्रधानांनी जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस यांच्या शुभेच्छांबद्दल मायगव्ह द्वारे एक्सवर एक पोस्ट सामायिक केली आहे :
“जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस यांनी स्वच्छ भारत अभियानाच्या 10 व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान @narendramodi यांची आणि सरकारच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. या परिवर्तनात्मक उपक्रमाद्वारे शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यात केलेली महत्त्वपूर्ण प्रगती त्यांनी अधोरेखित केली जी स्वच्छ आणि निरोगी राष्ट्राला प्रोत्साहन देण्यासाठी समुदायांना एकत्रित करते.
#10YearsOfSwachhBharat #SBD2024 #SHS2024”
जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांच्या शुभेच्छांबाबत मोदी यांनी मायगव्ह द्वारे एक्सवर एक पोस्ट सामायिक केली:
“जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी म्हटले आहे की स्वच्छ भारत अभियानाने पंतप्रधान @narendramodi यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली एक उल्लेखनीय टप्पा गाठत सुधारित स्वच्छतेच्या माध्यमातून भारतामध्ये लक्षणीय परिवर्तन घडवून आणले आहे. #10YearsOfSwachhBharat #SBD2024 #SHS2024”
आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मासात्सुगु असाकावा यांच्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी मायगव्ह द्वारे एक्स वर एक पोस्ट सामायिक केली:
“आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मासात्सुगु असाकावा यांनी स्वच्छ भारत अभियान या एका परिवर्तनकारी मोहिमेचे नेतृत्व केल्याबद्दल पंतप्रधान @narendramodi यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, आशियाई विकास बँकेला सुरुवातीपासूनच या दूरदर्शी उपक्रमासाठी भारतासोबत भागीदारी केल्याचा अभिमान वाटतो. #10YearsOfSwachhBharat #SBD2024 #SHS2024”
आध्यात्मिक नेते श्री श्री रविशंकर यांच्या शुभेच्छांबद्दल मोदी यांनी मायगव्ह द्वारे एक्स वर एक पोस्ट सामायिक केली:
“आपले आदरणीय पंतप्रधान@narendramodi जी यांनी स्वच्छ भारत अभियान को जेव्हापासून देशभरात सुरु केले आहे तेव्हापासून आम्ही पाहात आहोत की स्वच्छतेप्रति लोक जागरूक झाले आहेत. : श्री श्री रविशंकर, अध्यात्मिक नेते #10YearsOfSwachhBharat #SBD2024 #SwachhBharat”
टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी मायगव्ह द्वारे एक्स वर एक पोस्ट सामायिक केली:
“मी माननीय पंतप्रधान @narendramodi यांचे #10YearsOfSwachhBharat निमित्त अभिनंदन करतो. @RNTata2000, अध्यक्ष, टाटा ट्रस्ट #SBD2024 #SwachhBharat”
मोदी यांनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि परोपकारी बिल गेट्स यांच्या शुभेच्छांबद्दल मायगव्ह द्वारे एक्स वर एक पोस्ट सामायिक केली:
“स्वच्छ भारत अभियानाचा स्वच्छता, आरोग्यावरील प्रभाव आश्चर्यकारक आहे - @BillGates, संस्थापक,मायक्रोसॉफ्ट आणि परोपकारी #10YearsOfSwachhBharat वर त्यांचे विचार ऐका. #NewIndia #SwachhBharat”
***
S.Patil/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2061117)
Visitor Counter : 41
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam