राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींना दिल्या शुभेच्छा

Posted On: 01 OCT 2024 9:06PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 ऑक्‍टोबर 2024

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला दिलेल्या आपल्या संदेशात म्हटले आहे:-

“सर्व नागरिकांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांच्या 155 व्या जयंतीनिमित्त मी विनम्र आदरांजली अर्पण करते.

सत्य आणि अहिंसेचे पुजारी  असणा-या बापूंचे जीवन संपूर्ण मानवतेसाठी एक अव्दितीय संदेश आहे. त्यांनी आपल्याला शांतता आणि सहकार्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. गांधीजींनी अस्पृश्यता, निरक्षरता, स्वच्छतेचा अभाव आणि इतर सामाजिक कुप्रथांचे  निर्मूलन करण्यासाठी मोहिमा हाती घेतल्या आणि महिला सक्षमीकरणासाठी अथक प्रयत्न केले.

गांधीजींनी शाश्वत मूल्यांचे प्रतीक होते आणि नैतिकतेवर आधारित आचरणाचा उपदेश त्यांनी केला. त्याचा संघर्ष सर्वात कमकुवत आणि सर्वात दुर्बल लोकांना बळकट करण्याभोवती केंद्रित होता. त्यांच्या विचारांनी जगातील अनेक महान व्यक्तिमत्त्वांवर प्रभाव टाकला आणि त्यांनी गांधीजींचे आदर्श आपल्या जीवन पद्धतींमध्ये स्वीकारले.

या जयंतीदिनी  आपण सत्य, अहिंसा, प्रेम आणि पवित्रता ही मूल्ये आत्मसात करण्याचा संकल्प करूया आणि गांधीजींच्या स्वप्नातील  भारताच्या कल्पना साकारताना देश आणि समाजाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करूया.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हिंदीतील संदेशासाठी येथे क्लिक करावे

 

* * *

N.Chitale/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2060929) Visitor Counter : 13