सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

येत्या 1 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय वृध्द व्यक्ती दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन


ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि समाजाप्रती या व्यक्तींनी दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी केंद्र सरकार महिनाभर विविध उपक्रमांचे आयोजन करणार

Posted On: 30 SEP 2024 5:43PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 सप्‍टेंबर 2024

 

भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय (एम/ओ एसजेई) नेहमीच पुढाकार घेत आले आहे. याच धर्तीवर, उद्या नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय वृध्द व्यक्ती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी केंद्रीय एसजेई राज्यमंत्री बी.एल.वर्मा सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित असतील.

या संदर्भातील कटीबद्धता कायम राखत, उद्या, 1 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय वृध्द व्यक्ती दिन 2024 साजरा करण्यात येणार असून, त्यानिमित्त ज्येष्ठ नागरिकांनी समाजाला दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी तसेच या नागरिकांचे हित साधण्यासाठी येता महिनाभर विविध उपक्रमांची व्यापक मालिका हाती घेण्यात येणार आहे. या विषयाबाबत जागरुकता वाढवणे तसेच सामान्य जनता, नागरी संस्था आणि इतर सरकारी संस्थांना तत्संबंधित कार्यात सक्रीय सहभाग घेण्यास प्रोत्साहित करणे हा या कार्यक्रमाच्या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. विविध पिढ्यांतर्गत संबंध जोपासण्याचे महत्त्व ठळकपणे मांडणे, ज्येष्ठ नागरिकांच्या अनमोल योगदानाचा सन्मान करणे आणि या नागरिकांच्या हिताबाबत समाजात जागरुकता निर्माण करणे ही देखील या उपक्रमाच्या आयोजनामागील इतर उद्दिष्ट्ये आहेत.

स्पेनमध्ये माद्रिद येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या वृद्धता विषयक दुसऱ्या महासभेत वृद्धत्वाच्या संदर्भातील राजनैतिक जाहीरनामा आणि माद्रिद आंतरराष्ट्रीय कृती योजना यांच्यावर भारताने सह्या केल्या आहेत. संयुक्त राष्ट्र महासभेने 14 ऑक्टोबर 1990 रोजी जाहीर केल्यानुसार 1 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय वृध्द व्यक्ती दिन म्हणून निश्चित करण्यात आला. महासभेने आंतरराष्ट्रीय वृद्धत्व विषयक कृती योजना 1982 च्या आधारावर वृध्द व्यक्तींसाठीच्या संयुक्त राष्ट्रांच्या तत्वांचा स्वीकार केला. स्वातंत्र्य, सहभाग, काळजी, आत्मसंतुष्टता आणि सन्मान ही ती चार तत्वे आहेत. उत्तम आरोग्य आणि स्वास्थ्य यांच्या संदर्भातील शाश्वत विकास ध्येय (3) ला अनुसरून संयुक्त राष्ट्र दशक 2021-30 हे निरोगी वृद्धत्वाचे दशक म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. भारताने माद्रिद योजनेच्या घोषणेआधीच वर्ष 1999 मध्ये वृध्द व्यक्तींसाठीचे राष्ट्रीय धोरण(एनपीओपी) तयार केले होते.

ऑक्टोबर 2024 मध्ये एमओएसजेई तर्फे आयोजित महत्त्वाचे उपक्रम:

  1. 1 ऑक्टोबर 2024 रोजी होणारे कार्यक्रम:
    1. मुख्य कार्यक्रम: नवी दिल्ली येथील शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना शपथ देण्याचा कार्यक्रम होईल.
    2. राष्ट्रीय वयोश्री शिबिरे: भारतभरात वेगवेगळ्या 51 ठिकाणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या हालचालीतील सुलभता वाढवण्याच्या आणि त्यांचे एकंदर स्वास्थ्य सुधारण्याच्या दृष्टीने उपयुक्त असलेली सहाय्यक साधने आणि इतर आवश्यक सेवा पुरवण्यात येणार आहे.
  2. आंतरमंत्रालयीन सहयोग: केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने केंद्रीय महिला आणि बालविकास, शिक्षण, ग्रामविकास, पर्यटन, गृह व्यवहार, आयुष इत्यादींसह विविध मंत्रालयांशी पत्रव्यवहार करुन त्यांना ज्येष्ठ नागरिकांच्या स्वास्थ्यात वाढ करण्याच्या उद्देशाने विशिष्ट उपक्रम सुरु करण्याची विनंती केली आहे.
  3. चर्चात्मक कार्यक्रमांच्या मालिका: राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्थेतर्फे (एनआयएसडी) 16 ऑक्टोबरपासून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांबाबत विचारविनिमयकरणाऱ्या चर्चात्मक कार्यक्रमांच्या मालिका आयोजित करण्यात येणार आहेत.
  4. क्षेत्रीय साधनसंपत्ती प्रशिक्षण केंद्रांतर्फे (आरआरटीसीज) कार्यक्रम/उपक्रमांचे आयोजन: केंद्रीय मंत्रालयाच्या ज्येष्ठ नागरिक विभागाच्या अंतर्गत कार्यरत आरआरटीसीज तर्फे ज्येष्ठ नागरिक कल्याण या विषयाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम/ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून त्यामध्ये वॉकेथॉन, चर्चात्मक कार्यक्रम, युवक/मुलांच्या मिरवणुका, विद्यापीठे/ महाविद्यालये/संस्था यांमध्ये शपथदान तसेच जनजागृती सत्रे यांचा समावेश असेल. एमओएसजेईतर्फे निधी मिळत असलेल्या आणि वृद्धाश्रम चालवण्याची जबाबदारी असलेल्या बिगर-सरकारी संस्थांतर्फे संबंधित वृद्धाश्रमांमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.
  5. मायगव्ह प्रश्नमंजुषा आणि शपथ अभियान:
    1. केंद्र सरकारच्या मायगव्ह मंचावर ज्येष्ठ नागरिकांचे हक्क आणि कल्याणकारी योजना यांच्यावर आधारित राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नमंजुषा सुरु करण्यात आली आहे. ही स्पर्धा सर्व वयोगटांमध्ये सदर विषयासंदर्भात जागरूकता वाढवेल.
    2. मायगव्ह मंचावरील समर्पित शपथ नागरिकांना त्यांच्या संपर्कातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, आदर आणि कल्याण यांची सुनिश्चिती करण्यासाठी कटिबद्ध करेल.
  6. ज्येष्ठ नागरिक कल्याण पोर्टलची सुरुवात: सरकारतर्फे लवकरच ज्येष्ठ नागरिक कल्याण पोर्टल सुरु करण्यात येणार असून हे पोर्टल ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित योजना, धोरणे आणि कल्याणकारी उपाययोजना यांची माहिती प्रसारित करण्यासाठीचा सर्वसमावेशक मंच म्हणून कार्य करेल.
  7. सांस्कृतिक महामेळावा: दिनांक 24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ‘सेलिब्रेटिंग ग्रेसफुल एजिंग: लाईफ बिगिन्स अॅट 60’ नामक सांस्कृतिक कार्यक्रमात  70 वर्षे वय असलेल्या कलाकारांचे कार्यक्रम सादर होणार असून हा कार्यक्रम वृद्धत्वाचा काळ सक्रीय राहून व्यतीत करण्याचा संदेश देणारा असेल.  
  8. ग्रँड फिनाले: महिनाभर सुरु असणारा हा उत्सव नवी दिल्ली येथे आयोजित ग्रँड फिनाले या महासमारोपपर कार्यक्रमासह संपन्न होईल.

 

* * *

JPS/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2060344) Visitor Counter : 14