महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या उपस्थितीत उद्या रांची येथे 7 व्या राष्ट्रीय पोषण माह 2024 चा समारोप होणार


राज्ये/केंद्रशासित प्रदेशांद्वारे आतापर्यंत या पोषण महिन्यात सुमारे 12 कोटी उपक्रम आयोजित

प्रविष्टि तिथि: 29 SEP 2024 10:07AM by PIB Mumbai

 

रांचीच्या शौर्य सभागृहात उद्या केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि झारखंडचे राज्यपाल संतोष गंगवार यांच्या उपस्थितीत 7 व्या राष्ट्रीय पोषण माह 2024 चा समारोप समारंभ होणार आहे.

1-30 सप्टेंबर या कालावधीतल्या या पोषण माह अंतर्गत ॲनिमिया प्रतिबंध, , पूरक आहार आणि पोशन भी पढाई भी यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यात उत्तम प्रशासनासाठी तंत्रज्ञान ही संकल्पनाही राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये 'एक पेड माँ के नाम' उपक्रमाद्वारे 'पर्यावरण रक्षणावर भर देण्यात आला. त्यात सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये वृक्षारोपणाला प्रोत्साहन देण्यात आले. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांद्वारे आत्तापर्यंत सुमारे 12 कोटी उपक्रम या पोषण माहमध्ये आयोजित करण्यात आले.

सुधारित पोषण आणि अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन डिलिव्हरी (ईसीसीई) साठी सक्षम अंगणवाड्यांना मजबूत करणे, त्यांच्या श्रेणीत सुधारणा करून त्यांना नवसंजिवनी दिली जाते. संपूर्ण भारतातील 11 हजाराहून अधिक सक्षम अंगणवाडी केंद्रांचे उद्याच्या समारोप समारंभात आभासी माध्यमातून उद्घाटन केले जाईल.

हा माह म्हणजे निरोगी आणि पोषणयुक्त भारतासाठी सामूहिक प्रयत्नांचा उत्सव होता. समारोप समारंभात सहभागी राज्यांच्या समर्पणाची तसेच संबंधितांची महत्वाची भूमिका अधोरेखित केली जाणार आहे. सक्षम अंगणवाडी केंद्रांद्वारे लाभार्थी आणि समुदायांचा वाढीव सहभाग असलेला हा कार्यक्रम संपूर्ण भारतात वेबलिंकद्वारे वेबकास्ट केला जाईल: https://webcast.gov.in/mwcd/  

***

N.Chitale/P.Jambhekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2060171) आगंतुक पटल : 97
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Gujarati , Tamil , Kannada , Malayalam