उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

महिला आणि शिक्षण ही देशाला ‘विकसित भारत’च्या उद्दिष्टाकडे घेऊन जाणाऱ्या रथाची दोन चाके आहेत - उपराष्ट्रपती

Posted On: 28 SEP 2024 5:27PM by PIB Mumbai

 

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज स्त्री शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. “स्त्रियांशिवाय आणि शिक्षणाशिवाय आपण विकसित भारताचे स्वप्न पाहू शकत नाही. महिला आणि शिक्षण ही देशाला चालवणाऱ्या रथाची दोन चाके आहेत”, असे ते म्हणाले.

जयपूर येथील इंडिया इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधताना उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज शिक्षणाचे, विशेषत: महिला शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

उपराष्ट्रपतींनी आपल्या भाषणात नुकत्याच लागू झालेल्या महिला आरक्षण विधेयकाचेही कौतुक केले. या विधेयकाद्वारे संसद आणि राज्य विधीमंडळांमध्ये महिलांसाठी एक तृतीयांश आरक्षण अनिवार्य करण्यात आले आहे. उपराष्ट्रपतींनी दर्जेदार आणि उद्देशपूर्ण शिक्षण देण्याच्या क्षमतेबद्दल राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी) प्रशंसा केली.  शिक्षणाशिवाय कोणताही बदल होऊ शकत नाही, हे उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केले. शिक्षण हे हेतुपूर्ण शिक्षण असले पाहिजे तसेच शिक्षण हे पदवीच्या पलीकडे असले पाहिजे, असेही ते म्हणाले.

2047 साली ‘विकसित भारत’ हे उद्दिष्ट साध्य करण्यात युवा वर्गाच्या भूमिकेवर भर देताना विकसित राष्ट्राचा दर्जा प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारे घटक देशातच आहेत, असे त्यांनी सांगितले.  देशात सर्वत्र समान कायदे लागू करण्याकडे लक्ष वेधून उपराष्ट्रपती म्हणाले की ‘कायद्यासमोर सर्व समान’ ही संविधानाने करून ठेवलेली तरतूद फार पूर्वीपासून आपल्यापासून दूर ठेवली गेली आहे. काहींना वाटते की ते इतरांपेक्षा अधिक समान आहेत, तर काहींना वाटते की आपण कायद्याच्या आवाक्याबाहेर आहोत, आम्ही कायद्याच्या वर आहोत. पण आता एक मोठा बदल घडून आला आहे तो म्हणजे कायद्यापुढे सर्वजण समान, आणि हीच आता वस्तुस्थिती आहे.

संपूर्ण मजकूर येथे वाचा: https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2059854

***

M.Pange/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2059881) Visitor Counter : 11


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil