भारतीय निवडणूक आयोग
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सरासरी 57.03% मतदान
Posted On:
26 SEP 2024 4:42AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 26 सप्टेंबर 2024
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात रात्री पावणेबारा वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार सुमारे 57.03% मतदान झाले. मतदान कर्मचारी पथके आपापल्या कार्यक्षेत्रातून परत आल्यानंतर त्यांच्याकडील आकडेवारी मिळवून क्षेत्रीय अधिकाऱ्यांतर्फे वेळोवेळी ही आकडेवारी विधानसभा आणि जिल्हा निहाय वोटर टर्नआउट अॅपवर अद्ययावत करण्यात येईल.
रात्री पावणेबारा वाजेपर्यंत मिळालेल्या मतदानाची जिल्हानिहाय अंदाजित आकडेवारी खाली दिली आहे:
दुसऱ्या टप्प्यातील (पावणेबारा वाजेपर्यंत) मतदानाची जिल्हानिहाय अंदाजित आकडेवारी:
Sl. No. |
District |
No. ACs |
Approximate Voter Turnout % |
1 |
Budgam |
5 |
62.98 |
2 |
Ganderbal |
2 |
62.51 |
3 |
Poonch |
3 |
73.80 |
4 |
Rajouri |
5 |
70.95 |
5 |
Reasi |
3 |
74.70 |
6 |
Srinagar |
8 |
29.81 |
Above 6 Districts |
26 |
57.03 |
येथे दिलेली आकडेवारी, क्षेत्र अधिका-यांनी यंत्रणेत अद्ययावत केलेल्या माहितीवर आधारित आहे. काही मतदान केंद्रांवरून (पीएस) आकडेवारी मिळण्यास उशीर होत आल्यामुळे या संख्या अंदाजित आहेत आणि यामध्ये पोस्टाद्वारे झालेल्या मतदानाची आकडेवारी समाविष्ट करण्यात आलेली नाही. प्रत्येक मतदान केंद्रामध्ये झालेल्या प्रत्यक्ष मतदानाची खरी आकडेवारी मतदान संपल्यानंतर मतदान अधिकाऱ्याकडे असलेल्या अर्ज क्र.17 सी मध्ये नोंदवण्यात आली आहे.
***
NM/SanjanaC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2058917)
Visitor Counter : 60