पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या पंतप्रधानांची घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
22 SEP 2024 11:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2024
संयुक्त राष्ट्र महासभेच्या 79 व्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांची भेट घेतली.
दोन्ही नेत्यांनी भारत आणि नेपाळमधील अनोख्या आणि घनिष्ट द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला आणि विकास भागीदारी, जलविद्युत सहकार्य, नागरिकांमधील परस्पर संबंध आणि भौतिक, डिजिटल आणि ऊर्जा क्षेत्रातील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासह विविध क्षेत्रात झालेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (आयएसए) मध्ये पूर्ण सदस्य म्हणून सामील होणारा 101 वा देश बनल्याबद्दल पंतप्रधानांनी नेपाळचे अभिनंदन केले आणि हवामान बदलाच्या आव्हानाला प्रादेशिक प्रतिसादाचे महत्त्व अधोरेखित केले.
शेजाऱ्यांना प्राधान्य धोरणांतर्गत अंतर्गत नेपाळ हा भारताचा प्राधान्य भागीदार आहे. आमच्या शेजाऱ्यांना प्राधान्य धोरणाला पुढे नेण्यासाठी ही बैठक भारत आणि नेपाळ यांच्यात नियमित उच्चस्तरीय देवाणघेवाण करण्याची परंपरा कायम ठेवते.
* * *
N.Chitale/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2057851)
आगंतुक पटल : 68
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam