पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                    
                    
                        अमेरिकेने भारताला 297 प्राचीन कलाकृती परत केल्या
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                22 SEP 2024 8:49PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2024
 
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक व्यवहार ब्युरो यांनी उभय देशांमधील घनिष्ठ द्विपक्षीय संबंध कायम राखण्यासाठी आणि उत्तम  सांस्कृतिक समज वाढवण्याच्या उद्देशाने जुलै 2024 मध्ये सांस्कृतिक संपत्ती करारावर स्वाक्षरी केली होती. सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी सहकार्य वाढवण्यासाठी  अध्यक्ष बायडेन  आणि पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलेली वचनबद्धता पूर्ण करणे हा यामागचा उद्देश असून  जून 2023 मधील त्यांच्या बैठकीनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात ते प्रतिबिंबित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या निमित्ताने, अमेरिकेने भारतातून चोरीला गेलेल्या किंवा तस्करी करून नेण्यात आलेल्या  297 प्राचीन कलाकृती  परत करण्यात मदत  केली आहे . त्या लवकरच भारताला  परत केल्या जातील. विल्मिंग्टन, डेलावेअर येथे झालेल्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष बायडेन यांना प्रतिकात्मक स्वरूपात  काही निवडक कलाकृती दाखवण्यात आल्या. या कलाकृती परत करण्यासाठी अध्यक्ष बायडेन  यांनी केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले. त्यांनी नमूद केले की या कलाकृती  केवळ भारताच्या ऐतिहासिक भौतिक संस्कृतीचा भाग नाहीत, तर भारतीय संस्कृती आणि चेतनेचा आंतरिक गाभा आहेत .
या प्राचीन कलाकृती सुमारे 4000 वर्षे जुन्या कालखंडातील 2000 ईसवीसन पूर्व  ते 1900 ईसवी सना पर्यंतच्या काळातील  आहेत आणि त्यांचा उगम भारताच्या विविध भागांमध्ये झाला आहे. यातील बहुतांश प्राचीन वस्तू पूर्व भारतातील टेराकोटा कलाकृती आहेत, तर इतर दगड, धातू, लाकूड आणि हस्तिदंताने बनवलेल्या आहेत आणि त्या देशाच्या विविध भागांतील आहेत. हस्तांतरित केलेल्या काही उल्लेखनीय प्राचीन कलाकृती पुढीलप्रमाणे :
	- मध्य भारतातील 10-11व्या शतकातील  वाळूच्या दगडातील अप्सरेची मूर्ती;
 
	- मध्य भारतातील 15-16 व्या शतकातील  कांस्य धातूमधील जैन तीर्थंकर यांची मूर्ती ;
 
	- पूर्व भारतातील तिसऱ्या-चौथ्या शतकातील  टेराकोटा फुलदाणी;
 
	- दक्षिण भारतातील इ.स.पूर्व 1 ते  इसवी सन पहिले शतक काळातील  दगडी शिल्प
 
	- दक्षिण भारतातील 17-18 व्या शतकातील   कांस्य धातूमधील  भगवान गणेश मूर्ती ;
 
	- उत्तर भारतातील 15 व्या -16 व्या शतकातील  वाळूच्या दगडापासून बनवलेली भगवान बुद्धाची उभी प्रतिमा ;
 
	- पूर्व भारतातील 17-18 व्या शतकातील कांस्य धातूतील भगवान विष्णूची मूर्ती ;
 
	- उत्तर भारतातील 2000-1800 BCE मधील तांब्यापासून तयार  मानवरुपी आकृती ;
 
	- दक्षिण भारतातील 17-18 व्या शतकातील कांस्य धातूतील भगवान कृष्णाची मूर्ती;
 
	- दक्षिण भारतातील  13-14 व्या शतकातील ग्रॅनाइटमधील भगवान कार्तिकेय यांची मूर्ती
 
अलीकडच्या काळात, सांस्कृतिक मालमत्ता परत करणे हा भारत-अमेरिका सांस्कृतिक समज आणि आदानप्रदान मधील एक महत्त्वाचा पैलू बनला आहे. 2016 पासून,अमेरिका सरकारने मोठ्या प्रमाणात तस्करी किंवा चोरीला गेलेल्या प्राचीन कलाकृती भारतात परत आणण्यात मदत  केली आहे. जून 2016 मध्ये पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान 10 प्राचीन कलाकृती  परत करण्यात आल्या; सप्टेंबर 2021 मधील  त्यांच्या दौऱ्यादरम्यान 157 प्राचीन कलाकृती आणि गेल्या वर्षी जूनमध्ये त्यांच्या दौऱ्यादरम्यान आणखी 105 प्राचीन कलाकृती परत करण्यात आल्या.  2016 पासून अमेरिकेतून भारताला परत केलेल्या सांस्कृतिक कलाकृतींची एकूण संख्या 578 झाली आहे. कोणत्याही देशाद्वारे  भारताला  परत केलेल्या सांस्कृतिक कलाकृतींची ही सर्वाधिक संख्या आहे.
 
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com  
/PIBMumbai   
 /pibmumbai
                
                
                
                
                
                (Release ID: 2057671)
                Visitor Counter : 125
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam