सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीच्या 100 दिवसात सहकार मंत्रालयाद्वारे हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांबाबत आज नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षपद भूषवले


अमित शाह यांनी 2 लाख नवीन पॅक्स , प्राथमिक डेअरी आणि मत्स्य सहकारी संस्थांची स्थापना आणि मजबुतीकरण यावरील 'मार्गदर्शिका' सह श्वेत क्रांती 2.0 आणि 'सहकारी संस्थांमध्ये सहकार्य' यावरील मानक संचालन प्रक्रियेचा प्रारंभ केला

श्वेत क्रांती 2.0 महिला स्वावलंबन आणि सक्षमीकरणाबरोबरच कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला बळ देईल

मोदी 3.0 च्या सुरुवातीच्या 100 दिवसांमध्ये हाती घेतलेले 10 उपक्रम सहकार क्षेत्राला आत्मनिर्भर आणि व्यापक बनवण्याचे काम करतील

ग्रामीण भागातील महिलांना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवण्यासाठी दुग्धव्यवसाय हे सर्वात योग्य माध्यम आहे

प्रत्येक व्यक्तीचे चांगले गुण एकत्रित करून त्यांचा राष्ट्राच्या विकासात उपयोग करणे हे सहकाराचे उद्दिष्ट आहे

Posted On: 19 SEP 2024 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2024

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीच्या 100 दिवसात सहकार मंत्रालयाद्वारे हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांबाबत नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षपद भूषवले . याप्रसंगी  केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास आणि पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ लल्लन सिंह, सहकार राज्यमंत्री  मुरलीधर मोहोळ आणि सहकार मंत्रालयाचे सचिव डॉ. आशिष कुमार भुतानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अमित शाह यांनी 2 लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्था (पॅक्स), प्राथमिक डेअरी आणि मत्स्य सहकारी संस्थांची स्थापना आणि मजबुतीकरण यावरील  'मार्गदर्शिका' सह श्वेत क्रांती 2.0 आणि 'सहकारी संस्थांमध्ये सहकार्य' यावरील मानक संचालन प्रक्रियेचा प्रारंभ केला.

राष्ट्रीय परिषदेला संबोधित करताना, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील 100 दिवसांमध्ये सहकार मंत्रालयाने 10 महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत, त्यापैकी तीन उपक्रम आज सुरू करण्यात येत आहेत.

अमित शाह म्हणाले की, सहकार ही अशी शक्ती आहे जी व्यक्तीच्या सामर्थ्याला सामूहिकरीत्या एकत्र आणून त्याचे समाजाच्या शक्तीत रूपांतर करते. ते म्हणाले की, सहकाराचा हाच  मंत्र आहे की सर्वांनी एकत्र यावे,  प्रत्येकाचे चांगले गुण एकत्र यावेत , कुणाच्या उणिवा दिसू नयेत आणि  सर्वांचे चांगले गुण  राष्ट्राच्या विकासात उपयुक्त ठरावे.

अमित शहा म्हणाले की, श्वेत क्रांती 2.0 ची मानक कार्यप्रणाली (SoP) आज जारी करण्यात आली आहे. श्वेत क्रांती 2.0 महिला स्वावलंबन आणि महिला सक्षमीकरणाचे काम करेल असे ते म्हणाले. ते म्हणाले की, श्वेत क्रांती 2.0 ग्रामीण भागातील महिलांना रोजगार देण्याचे काम करेल. जेव्हा महिलांच्या नावे धनादेश येईल तेव्हा त्यांना खूप आनंद होईल.

अमित शाह म्हणाले की  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या संकल्पाला पशुसंवर्धनाच्या व्यवसायामुळे अधिक बळ मिळेल.

शेतीयोग्य जमिनीची सुपीकता वाढवण्याचे कामही पशुसंवर्धनाच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे केंद्रीय सहकार मंत्री म्हणाले.

अमित शहा म्हणाले की, “सहकारी संस्थांमध्ये सहकार्य” या स्वरूपात एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

 

N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2056838) Visitor Counter : 62