सहकार मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह गुरुवारी नवी दिल्ली येथे सहकार मंत्रालयाने 100 दिवसांत राबवलेल्या उपक्रमांवरील राष्ट्रीय परिषदेला करणार संबोधित
अमित शाह यांच्या हस्ते 2 लाख नवीन एमपीएसीएस, दुग्ध आणि मत्स्यपालन सहकारी संस्थांची निर्मिती आणि बळकटीकरण, श्वेतक्रांती 2.0 वरील मानक कार्यप्रणाली आणि सहकारी संस्थांमधील सहकार्य यावरील ‘मार्गदर्शिकेचे’ होणार प्रकाशन
Posted On:
18 SEP 2024 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 सप्टेंबर 2024
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह 19 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्लीतील पुसा येथे आयसीएआर कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेत सहकार मंत्रालयाच्या 100 दिवसांत राबवलेल्या परिवर्तनात्मक उपक्रमांच्या मालिकेचे उद्घाटन करतील. परिषदेच्या उद्घाटन सत्रात, गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह मंत्रालयातर्फे “सहकार-से-समृद्धी” या संकल्पनेंतर्गत “100 दिवस उपक्रम” चे उदघाटन करतील. ते 2 लाख नवीन एमपीएसीएस, सुविधा नसलेल्या गावात/पंचायतीत प्राथमिक दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन सहकारी संस्थांची निर्मिती आणि बळकटीकरण, श्वेतक्रांती 2.0 वरील मानक कार्यप्रणाली आणि सहकारी संस्थांमधील सहकार्य यावर ‘मार्गदर्शिकेचे’ प्रकाशन करतील.
प्रत्येक पंचायतीमध्ये नवीन बहुउद्देशीय पीएसीएस, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांची निर्मिती आणि बळकटीकरण याविषयी मार्गदर्शिका (कृती आराखडा):
देशात सुमारे 2.7 लाख ग्रामपंचायती आहेत, परंतु अनेक पंचायतींमध्ये प्राथमिक कृषी पत संस्था (पीएसीएस), दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन सहकारी संस्थांचा समावेश करणे बाकी आहे. देशाच्या सर्वांगीण आणि समतोल विकासामध्ये या प्राथमिक स्तरावरील सहकारी संस्थांनी बजावलेली महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन, भारत सरकारने देशातील सुविधा नसलेल्या ग्रामपंचायतींमध्ये नवीन बहुउद्देशीय पीएसीएस, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था स्थापन करण्याच्या योजनेला मान्यता दिली आहे. कालबद्ध पद्धतीने त्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी, सहकार मंत्रालयाने नाबार्ड, एनडीडीबी आणि एनएफडीबी यांच्या सहकार्याने ‘मार्गदर्शिका’ तयार केली आहे. नवीन बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या निर्मिती आणि बळकटीकरणामुळे, त्यांच्याशी निगडित कोट्यवधी लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. शिवाय, त्याचा देशाच्या संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गुणकारात्मक परिणाम होईल.
या कार्यक्रमास राष्ट्रीय सहकारी महासंघाचे अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक, मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी, अतिरिक्त मुख्य सचिव, सहकार, सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे अन्न आणि नागरी पुरवठा विभाग, सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील सहकारी संस्थांचे निबंधक, इतर संबंधित संस्थांचे उदा. नाबार्ड, एफसीआय, एनडीडीबी आणि एनएफडीबी चे अधिकारी यांच्यासह 2000 हून अधिक पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
S.Patil/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2056434)
Visitor Counter : 65