श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत सरकारकडून प्लॅटफॉर्म एग्रेगेटर आणि त्यांच्याकडील कामगारांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आमंत्रण


माहिती व नोंदणीबाबत मार्गदर्शनासाठी टोल-फ्री हेल्पलाईन (14434)

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय 18 सप्टेंबर 2024 रोजी घेणार मंच संकलकांची भेट

Posted On: 17 SEP 2024 1:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2024

श्रम आणि रोजगार मंत्रालयाने आणखी एक मोठे पाऊल उचलून सामाजिक सुरक्षेचे लाभ असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आमंत्रण प्लॅटफॉर्म एग्रेगेटर आणि त्यांच्याशी जोडलेल्या कामगारांना दिले आहे. कामगारांना समाज कल्याण योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आणि संकलकांना लाभार्थींची अचूक नोंदवही ठेवण्याच्या दृष्टीने ही नोंदणी महत्त्वाची आहे.

या प्रक्रियेबाबत मार्गदर्शनासाठी मंत्रालयाने एसओपी अर्थात प्रमाणित कार्यवाही पद्धतीसह मार्गदर्शक सूचनावली जारी केली आहे. त्यामध्ये कामगारांची नोंदणी आणि त्यांच्या माहितीचे अद्यतन करण्यासह प्लॅटफॉर्म एग्रेगेटरच्या अन्य जबाबदाऱ्यांचा समावेश आहे. नोंदणी केल्यावर कामगारांना यूएएन अर्थात युनिवर्सल अकाउंट नंबर मिळेल; तो वापरून त्यांना सामाजिक सुरक्षेचे लाभ मिळवता येतील.

केंद्र सरकारने अगदीच मोजक्या एग्रेगेटरच्या मदतीने एपीआय एकात्मिकरणाची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली असून नोंदणीच्या प्रक्रियेबाबत गती घेतली आहे. या संयुक्त प्रयत्नाचे उद्दीष्ट मंत्रालय आणि प्लॅटफॉर्म एग्रेगेटरच्या सहयोगाचे लाभ सर्व कामगारांपर्यंत पोहोचवण्याचे आहे.
मार्गदर्शक सूचनांमध्ये एग्रेगेटरना कामगारांची कामे आणि आर्थिक मोबदल्याविषयी सविस्तर माहिती नियमित अद्ययावत ठेवण्याची विनंती केली आहे.प्लॅटफॉर्म सोडून जाणाऱ्या कामगारांची तशी नोंद तातडीने केली जावी जेणेकरून अद्ययावत माहिती अचूक राहील.

कामगार आणि एग्रेगेटरना नोंदणी प्रक्रियेत मदत करण्यासाठी  टोल-फ्री हेल्पलाईन (14434) सुरू करण्यात आली आहे.त्यावर माहिती,नोंदणीसाठी मार्गदर्शन आणि नोंदणी प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या तांत्रिक समस्यांचे समाधान केले जाईल.

मंत्रालयाने 18 सप्टेंबर 2024 रोजी एग्रेगेटरसह बैठकीचे आयोजन केले असून तिच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ.मनसुख मांडवीय असतील.ते सहभागींना माहिती आणि या महत्वाच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देतील.


S.Tupe/R.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2055562) Visitor Counter : 58