अल्पसंख्यांक मंत्रालय
‘जागतिक नेतृत्वाला चालना देण्यासाठी बौद्ध धम्माची भूमिका’ या विषयावरील परिषदेचे उद्या मुंबईत होणार आयोजन
“जागतिक नेतृत्वाला मार्गदर्शन करण्यासाठी बुद्धाचा मध्यम मार्ग” या विषयावरील परिषदेला केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू उपस्थित राहणार
प्रविष्टि तिथि:
13 SEP 2024 10:24AM by PIB Mumbai
केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाकडून संयुक्तपणे 14 सप्टेंबर 2024 रोजी नेहरू सायन्स सेंटर, वरळी, मुंबई येथे "भविष्यातील जागतिक नेतृत्वाला मार्गदर्शन करण्यासाठी बुद्धाचा मध्यम मार्ग" या विषयावर एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात येणार आहे. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजीजू या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
जगाच्या भविष्यासाठी एक शाश्वत आदर्श प्रस्थापित करण्यासाठी वैयक्तिक आणि जागतिक स्तरावरील सध्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी, तत्वज्ञानविषयक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय विविधतेमध्ये धम्माच्या अनुयायांसाठी सार्वभौमिक मूल्यांचा प्रसार व अंतर्निहित करण्याचे मार्ग यावर विचारमंथन घडवणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आधुनिक बौद्ध धम्मासाठी असाधारण योगदान देणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारशाचाही या परिषदेत गौरव करण्यात येणार आहे. “आधुनिक काळात बौद्ध धम्माची भूमिका आणि प्रासंगिकता”, “मानवी मनातील जाणीवांशी संबंधित तंत्राचे महत्त्व” आणि “नव्या युगाचे नेतृत्व आणि बौद्ध धम्माची अंमलबजावणी” या तीन सत्रांचा या परिषदेत समावेश असेल. बुद्धाची शिकवण आणि धम्म तत्वज्ञानाच्या आधारे वैश्विक बंधुभावाचे लक्ष्य, शाश्वतता आणि एकंदर वैयक्तिक कल्याणाच्या उद्दिष्टासाठी व्यावहारिक उपायांवर ही पॅनेल्स विचारमंथन करतील.
***
S.Pophlale/S.Patil/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2054466)
आगंतुक पटल : 89