अर्थ मंत्रालय
केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मधल्या घोषणेच्या अनुषंगाने आर्थिक व्यवहार विभागाने परकीय चलन (कंपाउंडिंग प्रोसिडिंग) नियम, 2024 अधिसूचित केले
Posted On:
12 SEP 2024 7:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2024
परदेशी गुंतवणुकीचे नियम आणि नियमनामध्ये सुलभता आणण्याच्या उद्देशाने, केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने, अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने आज परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा), 1999 च्या कलम 15 समवेत कलम 46 अंतर्गत दिलेल्या अधिकारांच्या कक्षेत, परकीय चलन (कंपाउंडिंग प्रोसिडिंग, अर्थात चक्रवाढ कार्यवाही) नियम, 2024 अधिसूचित केले. 2000 मध्ये जारी करण्यात आलेल्या सध्याच्या परकीय चलन (कंपाउंडिंग प्रोसीडिंग) नियमांची जागा हे सुधारित नियम घेतील.
व्यवसाय सुलभतेसाठी सध्याचे नियम आणि नियमन अधिक सुव्यवस्थित आणि तर्कसंगत करण्याच्या व्यापक उपक्रमाचा एक भाग म्हणून, भारतीय रिझर्व्ह बँकेशी सल्लामसलत करून चक्रवाढ कार्यवाही बाबतच्या नियमांचे सर्वसमावेशक पुनरावलोकन करण्यात आले.
ती लागू करण्याची प्रक्रिया जलद आणि सुव्यवस्थित करण्यासाठी तरतुदी करणे, अर्ज शुल्क आणि चक्रवाढ रकमेसाठी डिजिटल पेमेंट पर्याय उपलब्ध करणे, आणि संदिग्धता दूर करण्यासाठी आणि प्रक्रियेमध्ये सुस्पष्टता आणण्यासाठी तरतुदींचे सुलभीकरण आणि तर्कसंगतीकरण यावर लक्ष केंद्रित करण्यावर विशेष भर देण्यात आला.
या सुधारणा गुंतवणुकदारांसाठी 'गुंतवणूक सुलभता' आणि व्यवसायांसाठी 'व्यवसाय सुलभता' याला प्रोत्साहन देण्याची सरकारची वचनबद्धता सूचित करतात.
अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करावे:
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2054298)
Visitor Counter : 53