आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात 15 जणांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2024 प्रदान
महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील आशा वामनराव बावणे फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार 2024 ने सन्मानित
Posted On:
11 SEP 2024 2:53PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात आयोजित एका कार्यक्रमात रुग्णसेवा करणाऱ्या परिचारिकांना वर्ष 2024 साठीचे राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. एकूण 15 परिचारिकांना समाजाप्रति त्यांच्या उल्लेखनीय कर्तव्यनिष्ठेबद्दल सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील सार्वजनिक आरोग्य परिचारिका आशा वामनराव बावणे या वर्ष 2024 च्या राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारप्राप्त व्यक्तींपैकी एक आहेत. आशा बावणे या चंद्रपूर मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे कार्यरत असून या सेवेत त्यांचा 28 वर्षांचा अनुभव असून यापैकी 20 वर्षे त्यांनी आदिवासी भागात काम केले आहे. अनेक राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असून अनेक CNE कार्यक्रमांना देखील त्या उपस्थित राहिल्या आहेत. विशेषत: कोविडच्या काळात लसीकरणाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. अतिसाराच्या प्रादुर्भावादरम्यान तसेच प्रामुख्याने हज यात्रेकरुंच्या लसीकरणाशी संबंधित त्यांनी केलेल्या कार्याचे प्रशस्तीपत्रात कौतुक करण्यात आले आहे.
परिचारिका आणि नर्सिंग व्यावसायिकांनी समाजासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून 1973 मध्ये भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कारांची स्थापना केली.
नोंदणीकृत सहाय्यक परिचारिका आणि दाई , नोंदणीकृत परिचारिका आणि दाई आणि नोंदणीकृत महिला अभ्यागत या श्रेणीमध्ये एकूण 15 पुरस्कार देण्यात आले. केंद्र, राज्य/केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये कार्यरत उत्कृष्ट नर्सिंग कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. रूग्णालय किंवा समुदाय संस्था शैक्षणिक किंवा प्रशासकीय संस्थांमध्ये नियमित नोकरीत असलेली परिचारिका राष्ट्रीय पुरस्कारासाठी पात्र आहे. प्रशस्तीपत्र , 1,00,000/- रुपये रोख आणि एक पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
आज पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेल्या देशभरातील अन्य परिचारिका खालीलप्रमाणे आहेत:
S. No
|
Category
|
State
|
Name
|
1
|
ANM
|
Andaman & Nicobar Islands
|
Ms Sheela Mondal
|
2
|
ANM
|
Arunachal Pradesh
|
Ms Iken Lollen
|
3
|
ANM
|
Puducherry
|
Ms Vidjeyacoumary V
|
4
|
ANM
|
Sikkim
|
Ms Januka Pandey
|
5
|
ANM
|
West Bengal
|
Ms Anindita Pramanik
|
6
|
LHV
|
Manipur
|
Ms Brahmacharimayum Amusana Devi
|
7
|
Nurse
|
Delhi
|
Major Gen Ignatius Delos Flora
|
8
|
Nurse
|
Delhi
|
Ms Prem Rose Suri
|
9
|
Nurse
|
Jammu & Kashmir
|
Dr Tabasum Irshad Handoo
|
10
|
Nurse
|
Karnataka
|
Dr Nagarajaiah
|
11
|
Nurse
|
Lakshadweep
|
Ms Shamshad Beegum A
|
12
|
Nurse
|
Maharashtra
|
Ms Asha Womanrao Bawane
|
13
|
Nurse
|
Mizoram
|
Ms H Mankimi
|
14
|
Nurse
|
Odisha
|
Ms Sanjunta Sethi
|
15
|
Nurse
|
Rajasthan
|
Mr Radhey Lal Sharma
|
राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार वितरण सोहळा येथे पाहता येईल:
***
S.Patil/S.Kane//P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2053789)
Visitor Counter : 89