संरक्षण मंत्रालय
एएसडब्ल्यु एसडब्ल्युसी (सीएसएल) प्रकल्पातील ‘माल्पे आणि मुल्की’, या चौथ्या आणि पाचव्या जहाजांचे एकाचवेळी जलावतरण.
Posted On:
10 SEP 2024 9:45AM by PIB Mumbai
मेसर्स कोचीन शिपयार्ड लिमिटेड द्वारे भारतीय नौदलासाठी बांधण्यात येणाऱ्या आठ पाणबुडीविरोधी वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट प्रकल्पातील चौथे आणि पाचवे जहाज ‘मालपे आणि मुल्की’, यांचे 09 सप्टेंबर 24 रोजी, सीएसएल कोची येथे जलावतरण करण्यात आले. सागरी परंपरेला अनुसरून, दक्षिण नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ व्हॉइस ऍडमिरल व्ही. श्रीनिवास यांच्या उपस्थितीत विजया श्रीनिवास यांच्या हस्ते दोन्ही जहाजांचे जलावतरण करण्यात आले.
माहे या श्रेणी - एएसडब्ल्यु शॅलो वॉटर क्राफ्ट्सला भारताच्या किनारपट्टीवरील रणनितीक दृष्ट्या मोक्याच्या आणि महत्त्वाच्या बंदरांचे नाव देण्यात आले आहे आणि हे जहाज आपल्या नावाला साजेशी कामगिरी करत पूर्वीच्या युद्धनौकांचा गौरवशाली वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करेल.
30 एप्रिल 2019 रोजी संरक्षण मंत्रालय आणि सीएसएल यांच्यात आठ एएसडब्ल्यु एसडब्ल्युसी जहाजे बांधण्याचा करार झाला होता.
माहे श्रेणीतील जहाजे स्वदेशी विकसित, अत्याधुनिक अंडरवॉटर सेन्सर्सने सुसज्ज असतील आणि किनारपट्टी लगतच्या भागात पाणबुडीविरोधी मोहीम तसेच कमी तीव्रतेच्या सागरी मोहीमा आणि माइन लेइंग कार्य करण्यासाठी यांची परिकल्पना करण्यात आली आहे. एएसडब्ल्यु एसडब्ल्युसी जहाजे 1800 टन भारासह 25 नॉट्सचा कमाल वेग मिळवू शकतात.
या जहाजांचे एकाचवेळी जलावतरण ‘आत्मनिर्भर भारत’ चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वदेशी जहाजबांधणी क्षेत्रातील भारताच्या प्रगतीवर प्रकाश टाकते. एएसडब्ल्यु एसडब्ल्युसी जहाजांमध्ये 80% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्री आहे. त्यावरून हे सुनिश्चित होते की भारतीय उत्पादन युनिट्सद्वारे मोठ्या प्रमाणावर संरक्षण उत्पादन कार्यान्वित होत आहे ज्याद्वारे देशात रोजगार निर्मिती वाढेल.
***
NM/SMukhedkar/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2053364)
Visitor Counter : 89