सांस्कृतिक मंत्रालय
दुसऱ्या आंतरराष्ट्रीय बौद्ध माध्यम परिषदेचे 11 सप्टेंबर रोजी दिल्लीत आयोजन
Posted On:
09 SEP 2024 11:34AM by PIB Mumbai
आंतरराष्ट्रीय बौद्धमहासंघ आणि विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन (व्हीआयएफ) "संघर्ष टाळणे आणि शाश्वत विकासासाठी वैचारिक संवाद " या संकल्पनेवर दुसऱ्या आंतरराष्ट्रीयबौद्ध माध्यम परिषदेचे आयोजन करत आहेत. भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार बायचुंग भुतिया हे या परिषदेचे सन्माननीय अतिथी असतील. नवी दिल्लीतील विवेकानंद इंटरनॅशनलफाऊंडेशन येथे 11 सप्टेंबर2024रोजी हा अनोखा कार्यक्रम होणार आहे. व्हीआयएफचे अध्यक्ष गुरुमूर्ती यांचे याप्रसंगी बीजभाषण होईल. या कार्यक्रमाला 18 देशांतीलमाध्यम प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
जागतिक संकटांना सामोरे जाण्यासाठी आणि माध्यम संस्थांवरील विश्वास वाढवण्यासाठी आधुनिक माध्यम पद्धतींमध्ये बौद्ध शिकवण कशी समाविष्ट करता येईल यावर लक्ष केंद्रित करणे हा दुसऱ्या आंतरराष्ट्रीय बौद्ध माध्यमपरिषदेचा प्राथमिक उद्देश आहे. नैतिक पत्रकारितेला चालना देणे, वैचारिक संवादाला प्रोत्साहन देणे आणि संपूर्ण आशियातील बौद्ध माध्यम व्यावसायिकांचे एक नेटवर्क स्थापन करणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.
पहिल्या परिषदेने 12 वेगवेगळ्या देशांतील बौद्ध पत्रकार आणि माध्यम क्षेत्रातील दिग्गजांसह सुमारे 150 प्रतिनिधींना एकत्र आणले आणि माध्यमांच्या कार्यपद्धतीत बौद्ध तत्वे एकीकृत करण्यासाठी एक मजबूत पाया रचला.
***
JPS/SushamaK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2053081)
Visitor Counter : 55